आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Haryana News : Congress Leader Kuldeep Bishnoi IT Raids Foreign Assets Worth Rs 200 Crore Uncovered

हरियाणा : काँग्रेस नेता कुलदीप बिश्नोई यांच्या 13 ठिकाणांवर प्राप्तीकर विभागाचा छापा, परदेशात 200 कोटींची संपत्ती असल्याचा केला खुलासा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पानीपत - प्राप्तीकर विभागाने 23 जुलै रोजी हरियाणाचे काँग्रेस नेता कुलपदीप बिश्नोई यांच्या विविध ठिकाणांवर छापा टाकला होता. जवळपास 89 तास ही छापेमारी सुरु होती. यामध्ये तब्बल 230 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती आणि कर चोरीचा खुलासा झाला आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की परदेशात बिश्नोई यांची 200 कोटींची संपत्ती असल्याची माहिती मिळाली आहे. याची माहिती तपास संस्थेसोबत सामायिक करण्यात येत आहे. आयकर विभागाने बिश्नोई यांच्या हरियाणा, दिल्ली आणि हिमाचलसह 13 ठिकाणांवर 23 जुलैपासून कारवाई सुरु केली होती. 

 


प्राप्तीकर विभागाने प्रेस रिलीजमध्ये सांगतिले की, गेल्या काही दिवसांपासून ज्या समुहावर कारवाई करण्यात आली. त्या समुहाला नियंत्रित करणारे शेजारील राज्यांत बऱ्याच काळापासून राजकीय पदांवर कार्यरत आहेत आणि त्यांनी कोट्यवधींची अघोषित संपत्ती गोळा केली आहे. आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांवरून त्यांच्याकडून अचल संपत्तीसाठी मोठ्या प्रमाणात अघोषित रोख रकमेची देवाण घेवाण झाल्याची माहिती मिळाली आहे. हे प्रकरण कुलदीप बिश्नोई यांच्या निगडीत असल्याचे अधिकृत सुत्रांचे म्हणणे आहे. 

 

पनामा, युके आणि युएई सारख्या देशांत आहे संपत्ती 
प्राप्तीकर अधिकाऱ्यांच्या मते, या छापेमारीत 30 कोटी रुपयांची कर चोरी आणि 200 कोटी रुपयांची अघोषित विदेशी संपत्तीचा खुलासा झाला आहे. ब्रिटिश आयलँड, पनामा, युके आणि युएई या देशांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून लपवून ठेवली होती. आता ही माहिती ईडी आणि तपास एजन्सींसोबत सामायिक करण्यात येत आहे. 

 

कुलदीप यांची पत्नी आणि मुलाची केली चौकशी
प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी 23 पासून कुलदीप बिश्नोई यांच्या ठिकाणांवर छापेमारी सुरु केली होती. 89 तास चाललेल्या या कारवाईमध्ये कुलदीप बिश्नोई, पत्नी रेणुका बिश्नोई, मुलगा भव्य बिश्नोई यांची चौकशी करण्यात आली. यानंतर कुलदीप यांनी 'फूंक मार के बुझाने की, क्या गजब कोशिश थी, जनाब.. हम वो चिराग हैं जिसे आंधियों ने पाला है.' असे ट्वीट केले.