आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उघड्यावर शौच करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ बनवला, मग 3 नराधमांनी धमकावून केला सामूहिक बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मथुरा - घरात शौचालय नसल्याने प्रातःविधीसाठी उघड्यावर जाणाऱ्या महिलेची अब्रू लुटण्यात आली आहे. शौचास गेली असतानाच गावातील नराधमांनी तिला अडवले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींपैकी एकाने महिलेची अब्रू लुटताना आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला. तसेच कुणाला या घटनेबद्दल सांगितल्यास तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. ही अमानवीय घटना उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी तीन आरोपींच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. एकाला अटक झाली तर इतरांचा शोध सुरू आहे. 


शौच करतानाचा व्हिडिओ बनवला
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या घरात शौचालय नाही. त्यामुळे ती नेहमीप्रमाणेच उघड्यावर शौच करण्यासाठी निघाली होती. याचवेळी त्या ठिकाणी कुणीतरी असल्याचा भास तिला झाला. वेळीच सावध होऊन तिने स्वतःला सावरले आणि मागे वळून पाहिले. तेव्हा गावातील तीन युवक मोबाईलमध्ये तिचा शौच करतानाचा व्हिडिओ बनवत होते. उठून त्यांना रागावले तेव्हा एकाने तिचा हात धरला आणि बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिघे तिच्यावर तुटून पडले. यानंतर तो व्हिडिओ दाखवून पीडितेवर आळी-पाळीने बलात्कार केला. महिलेचा आरोप आहे, की त्यापैकी एकाने गैरकृत्याचाही व्हिडिओ बनवला. तसेच कुणाला सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. 


पोलिस काय म्हणाले?
पीडित महिला मूळची हरियाणातील रहिवासी आहे. ती काही दिवसांपासून आपल्या बहिणीच्या घरी राहत होती. याच दरम्यान गावातील रिंकू, नवीन आणि सुनील यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. तसेच इतर दोघांचा शोध घेतला जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...