आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सपना चौधरीचे 'मूड बना लो' गाणे रिलीज होताच झाले व्हायरल, बार काउंटरवर उभे राहून डान्स करताना दिसली सपना : Video Viral 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. सपना चौधरी ही लवकरच 'दोस्ती के साइड इफेक्ट्स' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. चित्रपटाचे लेटेस्ट गाणे 'मूड बना लो' यूट्यूबवर खुप व्हायरल होत आहे. सपना चौधरीच्या चाहत्यांना हे गाणे खुप आवडत आहे. व्हिडिओमध्ये सपनाने वेस्टर्न ड्रेस घातला आहे. ती कधी बार काउंटर आणि कधी मित्रांसोबत डान्स करताना दिसतेय. सपनाने गाण्याचा एक व्हिडिओ क्लिप इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. या गाण्याला आतापर्यंत साडे तीन लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. चार मित्रांवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. हे चौघंही एकमेकांपासून खुप वेगळे आहेत. कुणाला श्रीमंतासोबत लग्न करायचे आहे तर कुणाला पोलिटिशियन बनायचे आहे, तर सपना चौधरी आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहते. तिचे हे स्वप्न पुर्णही होते. नंतर तिचे मित्र एका अडचणीत अडकतात आणि सपना त्यांना मदत करते. चित्रपटामध्ये सपनासोबतच विक्रांत आनंद, जुबेर के. खान, अंजू जाधव, नील मोटवानी आणि साई भलालही आहे. या गाण्याला देव नेगी, अदिती सिंह शर्मा आणि अल्ताफ सैयदने आवाज दिला आहे. याचे म्यूझिक अल्ताफ सैयद आणि मन्नी वर्माने आणि लिरिक्स दीपक नूरने दिले आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...