International Special / सोशल मीडियावर ''ब्लू फॉर सुडान'' मोहिमेने धरला जोर, प्रोफाइलवर निळा फोटो ठेवत आहेत युझर्स


दोन महिलांची रक्षा करताना मोहम्मद मत्तार यांना सुरक्षा रक्षकांनी केले होते ठार

दिव्य मराठी वेब

Jun 17,2019 04:18:00 PM IST

खार्तूम(सुडान)- येथे सध्या एका मोहिमेने सोशल मीडियावर चांगलाच जोर धरला आहे. या मोहिनेचे नाव 'ब्लू फॉर सुडान' असे आहे. सोशल मीडिया युझर्स लोकशाही आणि देशाच्या हितासाठी 'ब्लू फॉर सुडान' असे हॅशटॅग लिहून निळ्या रंगाचा फोटो शेअर करत आहेत. तसेच, ट्विटरवर युझर्सने आपला प्रोफाइलसुद्धा निळा फोटो ठेवला आहे. ही मोहीम मोहम्मद मत्तार यांच्या समर्थनात सुरू आहे. मत्तार हे 3 जून रोजी दोन महिलांना वाचवताना सुरक्षा रक्षकांकडून मारले गेले होते.


मत्तार यांच्या मित्राने आपल्या ट्विटरवर प्रोफाइलवर मत्तार यांच्या इंस्टाग्रामवर असलेला फोटो लावला होता. त्यानंतर 11 जूनला या मोहिमेला सुरूवात झाली. त्यामुळे मत्तार यांना श्रद्धांजली देण्यासाठी युझर्स अशा प्रकारचा फोटो आपल्या प्रोफाइलवर लावत असून युझर्स मत्तार यांना शहिदाचा दर्जा देत आहेत. आता या मोहिमेमध्ये प्रसिद्ध गायिका रिहाना यांनीसुद्धा सहभाग घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात या मोहिमेला प्रतिसाद मिळत आहे.

X
COMMENT