आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : हाय हिल घालून उंच कठड्यावर चढली ही अॅक्ट्रेस, तोल गेल्याने झाली चांगलीच पंचाईत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  बॉलिवूड स्टार्ससोबत कधीकधी अशा काही घटना घडतात, ज्यामुळे त्यांच्यावर लाजिरवाणे होण्याची वेळ येते. असेच काहीसे 'हेट स्टोरी 4' ची अॅक्ट्रेस उर्वशी रौतेलासोबत घडले. उर्वशी रौतेलाचा एक व्हिडिओ समोर आला असून, यामध्ये ती फोटोशूट करत असताना थोडक्यात पडताना वाचली. हा व्हिडिओ काही तासांतच एक लाखांहून अधिक लोकांनी बघितला आहे.

 

उर्वशी फोटोशूटसाठी एका बगिच्यातील उंच कठड्यावर चढली. यावेळी तिने पायात हाय हिल्स सँडल घातली होती. ती स्टाइलमध्ये पोज देत होती. पण अचानक तिचा बॅलेन्स बिघडला आणि पण कसेतरी तिने स्वतःला सावरले. पण नंतर तिला स्वतःलाच हसू आवरता आले नाही. 

 

38 वर्षांनी मोठ्या सनी देओलसोबत दिले होते बोल्ड सीन्स...

उर्वशीने 2013 मध्ये सनी देओलसोबत 'सिंह साब द ग्रेट' या चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. या चित्रपटाच्या रिलीजवेळी सनी देओल 57 वर्षांचा तर उर्वशी अवघ्या 19 वर्षांची होती. पहिल्याच चित्रपटात उर्वशीने सनीसोबत अनेक बोल्ड सीन्स दिले होते. उर्वशीच्या घरी अभिनयाची पार्श्वभूमी नाही. तिचे आईवडील दोघेही बिझनेस फिल्डमधून आहेत. त्यामुळे ते या ग्लॅमरस लाइफपासून दूर राहतात. चित्रपटांमध्ये आईवडिलांच्या परवानगीनंतरच बोल्ड सीन्स देत असल्याचे उर्वशी सांगते.

 

नाकारली होती सलमान खानच्या चित्रपटाची ऑफर...

उर्वशीला सलमान खान स्टारर 'सुल्तान'साठी अप्रोच करण्यात आल्याचे क्वतिचत लोकांना ठाऊक असावे. त्यावेळी उर्वशी मिस युनिव्हर्स कॉन्टेस्टमध्ये सहभागी होणार होती. त्यामुळे तिने हा चित्रपट नाकारला होता. उर्वशीने वयाच्या 17 व्या वर्षीपासून मॉडेलिंगला सुरुवात केली होती. त्यावेळी वय कमी असल्याने ती मिस इंडिया कॉन्टेस्टमध्ये सहभागी होऊ शकली नव्हती. 

बातम्या आणखी आहेत...