आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुजरात. भूत प्रेताच्या कथा लोकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करत असतात. भारतात असे अनेक ठिकाण आहेत, जिथे भूत प्रेत असणे सामान्य गोष्ट मानली जाते. तुम्हीही आजपर्यंत अनेक भूताच्या गोष्टी ऐकल्या असतील, पण आम्ही जी कथा सांगत आहोत, ती ऐकूण तुम्ही हैराण व्हाल.
हो, आज आम्ही गुजरात शहराची अशी एक कहानी सांगणार आहोत, जी ऐकूण तुम्ही चकीत व्हाल. लोक म्हणतात की, या संमुद्र किनारी काही अदृश्य शक्ती आहेत. या मनुष्यापेक्षा वेगळ्या आहेत.
संध्याकाळ होताच मनुष्याचे येणे बंद
संध्याकाळ होताच मनुष्याने येथे जाण्यास बंद आहे. चांदण रात्री या समुद्रकाठावार अदृश्य शक्ती येतात. संध्याकाळी समुद्राच्या खा-या पाण्यात सावल्या चालताना दिसतात. लोक मानतात की, येथे प्रेतांचा वास आहे आणि हे रात्री एकत्र येऊन आपल्या शक्तीचा उत्सव साजरा करतात.
या बीचचे नाव 'दमस बीच' आहे. येथे दिवसा अनेक प्रेमी युगुल येत जात राहतात. रात्र होताच हे बीच पुर्णपणे रिकामे होते. स्थानिक लोक म्हणतात की, रात्र झाल्यावर येथे आत्मा येतात. यामुळे याठिकाणी थांबणे योग्य नाही. भूत राहत असल्यामुळे येथील रेती पांढरी नाही तर काळी आहे.
सूरतपासून 20 किलोमीटर दूर दमस किंवा डुमस नावाच्या या बीचला लव्हर्सचे फेव्हरेट बीच म्हटले जाते. येथे दिवसभर कपल्स येत असतात. यासोबतच पर्यटकही येतात. पण स्थानिक लोक दावा करतात की, येथे संध्याकाळी भूत येतात आणि अनामिक भिती वाटते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.