Home | Khabrein Jara Hat Ke | Haunted Island Where Nobody Dares To Go, Abandoned From Years

50 वर्षांपासून निर्जन आहे हे बेट, आधी हजारो लोक राहायचे, पण आता जाण्यासाठी घ्यावी लागते सरकारची परवानगी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 03:58 PM IST

पॅरानॉर्मल एक्सपर्ट्स म्हणाले- येथे काहीतरी गडबड आहे.

 • Haunted Island Where Nobody Dares To Go, Abandoned From Years

  न्यूयॉर्क- अमेरिकेच्या ईस्ट नदीमध्ये उत्तरेकडे एक असे बेट आहे ज्याला भुतांचे घर समजले जाते. हे बेट 50 वर्षांपासून निर्जन आहे. आधी येथे हजारो लोक राहायचे पण नंतर अशा काही घटना घडल्या की, पाहता-पाहता हे बेट आयलंड निर्मनुष्य झाले. असे म्हटले जाते की, या बेटावर भुते राहतात. 20 एकरात पसरलेल्या या आयलंडवर अनेक इमारती आहेत, त्या एवढ्या दिवसांपासून पडीक आहेत की आता तेथे कोणी नात नाही. पॅरानॉर्मल एक्सपर्ट्सनी तर तेथे निगेटिव्ह एनर्जी असल्यामुळे काहीतरी गडबड असल्याचा दावा केला आहे...

  1885 पर्यंत हे बेट रिकामे होते. त्यानंतर येथे एक रूग्णालय बांधण्यात आले. या रूग्णलयात चिकनपॉक्सच्या रूग्णांना ठेवले जायचे. त्याकाळात चिकनपॉक्स एक जीवघेणा आजार होता आणि तो पसरू नये म्हणून त्या रूग्णांना शहरापासून दूर बेटावर ठेवले जायचे.

  अनेक आजारांसाठी बांधले रूग्णालय

  बेटावर भरपूर जागा होती म्हणून टीबीसह अनेक जीवघेण्या आजारांसाठी रूग्णालये बांधण्यात आली, आणि रूग्णांना येथे ठेवण्यात आले.

  बरा नाही झाला तर आयुष्यभर कैदेत

  असे सांगितले जाते की, जोपर्यंत हे आजार ठिक होत नाहीत तोपर्यंत रूग्णांना त्यांच्या घरी जाऊ दिले जात नव्हते. एखादा आजार बरा होत नसेल तर त्या रूग्णाला आयुष्यभर येथे कैद केले जायचे. त्यातल्या अनेक रूग्णांनी आत्महत्या केल्या आहेत.

  सतत होऊ लागले मृत्यु

  या बेटावर फक्त रूग्णांना ठेवले जायचे पण 1943 पासून येथे मृत्युचे तांडव सुरू झाले, एकानंतर एक शेकडो मृत्यु झाले. जे वाचले ते तेथून पळू आले. त्यानंतर या बेटाला भुतांचे बेट समजण्यात आले. येथील लोकांना त्या आत्महत्या केलेल्या रूग्णांच्या आत्मांनी मारल्याची चर्चा केली जाते.

  खरंच आत्मा आहेत?

  या मृत्युंचा जनरल स्लोकम जहाज दुर्घटनेशी संबंध जोडला जातो. 15 जून 1904 या आयलंडच्या जवळ वाफेवर चालणारे जहाज बूडाले होते आणि त्यात असलेले 1 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक वर्षापर्यंत या आयलंडजवळ अनेक मृतदेह आढळले आहेत तेव्हापासून या जागेवर जाणे सरकारने बंद केले.

 • Haunted Island Where Nobody Dares To Go, Abandoned From Years
 • Haunted Island Where Nobody Dares To Go, Abandoned From Years
 • Haunted Island Where Nobody Dares To Go, Abandoned From Years
 • Haunted Island Where Nobody Dares To Go, Abandoned From Years

Trending