आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षपूर्वक पाहा तुमच्या ATM कार्डवरील हे चिन्ह; यावरूनच अवघ्या काही सेकंदात अकाउंट रिकामे करू शकतात हॅकर्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - क्रेडीट कार्ड आणि डेबिट कार्डवर आज अनेक फीचर्स उपलब्ध झाले आहे. आता नवीन एटीएम कार्डमध्ये एक विशेष असे चिन्ह असते. तुमच्या कार्डवरही हे चिन्ह असेल तर त्याचा अर्थ तुमच्या कार्डमध्ये वायफाय आहे. वायफाय असलेल्या कार्डला कॉन्टॅक्टलेस क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असेही म्हटले जाते. या कार्डचा वापर करुन तुम्ही खरेदी करताना मर्चंट टर्मिनलमध्ये कार्ड डिपिंग अथवा स्वॅपिंगऐवजी कॉन्टॅक्टलेस कार्ड दाखवून पेमेंट करू शकता. 

कॉन्टॅक्टलेस कार्ड असल्यास कोणतेही पेमेंट करण्यासाठी कार्ड स्वाइप करण्याची गरज नसते. या कार्डमध्ये निअर फील्ड कम्युनिकेशन (NFC) चिप असते. या चिपमुळे शॉर्ट रेंज डेटा ट्रान्सफर करता येईल. याचा वापर करुन तुम्ही पॉइंट ऑफ सेल (PoS) डिव्हाइससला टच करुन पेमेंट करु शकता.

 

वायरलेस टेक्नोलॉजीवर आधारीत काम करते कॉन्टॅक्टलेस कार्ड
> कॉन्टॅक्टलेस पेमेंट्स शॉर्ट रेंज वायरलेस टेक्नोलॉजीच्या माध्यमातून काम करते. पीओएस मशीनवर तुम्हाला कार्डवर असलेल्या चिपला टच करुन पेमेंट करता येते. 
> कॉन्टॅक्टलेस कार्ड पीओएस मशीनच्या 4 सेंटीमीटर पर्यंतच्या सिमेत काम करते. या कार्डचा वापर करुन एकावेळी एकच ट्रांजॅक्शन करता येते. 
> ही पेमेंट टेक्नोलॉजी विकसित देशांमध्ये वेगाने प्रचलित होत आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, यूके आणि फ्रांस या देशांत चारपैकी एका व्यक्तीकडे कॉन्टॅक्टलेस कार्ड आहे. भारतातही या कॉन्टॅक्टलेस कार्डचा वापर होण्यास सुरुवात झाली आहे. 

 

कॉन्टॅक्टलेस कार्डचे फायदे 
> कार्ड स्वाइप न करता कमी वेळेत पेमेंट करता येते.  
> दुसऱ्याला कार्ड देण्याची गरज नाही.
> पासवर्ड न टाकता 2000 रुपयांपर्यंत ट्रांझेक्शन करता येते.

 

कॉन्टॅक्टलेस कार्ड वापरताना सावधानता बाळगणे आवश्यक
> 2016 रोजी एक फोटो व्हायरल झाला होता. फोटोत एक चोर ट्रेनमध्ये गर्दीच्या ठिकाणी पीओएस मशीनजवळ उभा दिसत होता.
> पीओएस मशीनमुळे कार्डला पिन न टाकता टच करुन पेमेंट होते. त्यामुळे कोणीही या कार्डवरुन पेमेंट करु शकते.
> आरबीआयने या कार्डचा वापर करुन 2 हजार रुपयांची मर्यादा ठेवली आहे. त्यापेक्षा जास्त पेमेंट करण्यासाठी पिन टाकणे आवश्यक आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...