आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाईट नेता मिळणे महाराष्ट्राची चूक नाही, अमृता फडणवीसांचा पु्न्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमृता फडणवीसांनी याआधीही ट्विटरवरून उद्धव ठाकरेंवर टीका केली होती
  • अमृता फडणवीस आणि शिवसेनेतील वाद शिगेला

मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोहोचला आहे. अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “वाईट नेता मिळणे ही महाराष्ट्राची चूक नाही” असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. यापूर्वी अमृता फडणवीस यांनी अनेकदा शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. यानंतर त्यांच्यावर अनेकांकडून सडकून टीका झाली होती.अमृता फडणवीसांनी केलेले ट्विट


“वाईट नेता मिळणे हा महाराष्ट्राचा दोष नाही. मात्र चांगला नेता कायम न ठेवणे हा महाराष्ट्राचा दोष, जागो महाराष्ट्र !” असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. इकोनॉमिक टाईम्स या वृत्तपत्राच्या ट्विटला रिट्विट करत त्यांनी हे ट्विट केले आहे.

ठाकरे आडनाव लावल्याने कुणी ठाकरे होत नाही 


यापूर्वी अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. “ठाकरे आडनाव लावल्याने कुणी ठाकरे होत नाही. त्यासाठी तत्त्वनिष्ठ असावे लागते”  असे अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या. या ट्विटनंतर शिवसेना महिला आघाडीने अमृता फडणवीसांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले होते. 
यानंतर शिवसेना महिला आघाडीच्या या आंदोलनाचा व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करताना अमृता फडणवीस म्हणतात, ''लोकांच्या माथी मारुन तुम्ही नेतृत्व सिद्ध करु शकत नाही, तो एक हल्ला असतो, नेतृत्व नाही. दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे !” असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते.