Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | hawkers gives Chillar of Rs 14 thousand rupes

गृहकर भरण्यासाठी फेरीवाल्याने दिली १४ हजार रुपयांची चिल्लर; चंद्रपूर पालिकेतील प्रकार

प्रतिनिधी | Update - Sep 07, 2018, 07:49 AM IST

चंद्रपूर महापालिकेच्या कर विभागात गुरुवारी घडलेला प्रसंग पाहून गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' या चित्रपटाची आठवण झाली. निवड

  • hawkers gives Chillar of Rs 14 thousand rupes

    नागपूर- चंद्रपूर महापालिकेच्या कर िवभागात गुरुवारी घडलेला प्रसंग पाहून "गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' या चित्रपटाची आठवण झाली. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना मकरंद अनासपुरे अनामत रक्कम भरण्यासाठी चिल्लर आणतो आणि अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडते. असाच काहीसा मजेदार किस्सा चंद्रपूर महापालिकेत घडला. गृहकर भरण्यासाठी एका फेरीवाल्याने चक्क १४ हजार ८०८ रुपयांची चिल्लर आणल्याने ती मोजता माेजता कर विभागातील कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली.


    चंद्रपूर महापालिकेने नागरिकांना गृहकराच्या नोटीस पाठवल्या आहेत. कराचा वेळेत भरणा न केल्यास पालिकेकडून जास्तीचे व्याज आकारले जात आहे. त्यामुळे नागरिक कर भरण्यासाठी घाई करत आहेत. हाच कर भरण्यासाठी दादमहल वॉर्डातील रहिवासी रंजन नंदाने यांनी पैशाची जुळवाजुळव सुरू केली. रंजन नंदाने यांचा फेरीचा व्यवसाय असून त्यांची परिस्थितीही हलाखीची आहे. कर भरण्यासाठी रोख रक्कम नसल्याने त्यांनी त्यांच्या मुलांनी २ ते ३ वर्षांपासून जमवलेल्या सुट्या पैशांचा गल्ला (पिगी बँक) फोडला आणि ही सर्व चिल्लर महापालिकेत जमा करण्यासाठी आणली. त्यात ५० पैसे, १ व २ रुपयांची नाणी होती. ही सर्व रक्कम १४ हजार ८०८ रुपयांची होती.

Trending