आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भूपेन हजारिका यांच्या मुलाने सांगितले, अद्याप निमंत्रणच मिळाले नाही, तर सन्मान नाकारण्याचा प्रश्नच येत नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी- नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात ईशान्येत विरोध वाढत असतानाच आसामी गायक भूपेन हजारिका यांच्या कुटुंबीयांनी भारतरत्न नाकारण्याचा निर्णय घेतला आहे.

 

अमेरिकेत वास्तव्यास असणारे हजारिका यांचे पुत्र तेज हजारिका यांनी आसाममधील एका वृत्तवाहिनीला सांगितले की, राज्यातील सद्य:स्थिती पाहता माझ्या वडिलांना मरणाेत्तर देण्यात येणारा भारतरत्न स्वीकारणार नाही. मात्र दिव्य मराठीने तेज यांना विचारले असता ते म्हणाले, मला अद्याप निमंत्रण मिळालेलेच नाही, तर नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र त्यांनी सांगितले की, नागरिकत्व विधेयकावरून जे होत आहे, ते भूपेन यांच्या विचारापेक्षा विपरीत आहे. एका वृत्तानुसार भारतरत्न न स्वीकारण्यावरून कुटुंबीयांत एकमत नाही. हजारिका यांचे बंधू समर म्हणाले, पुरस्कार नाकारण्याचा निर्णय एक व्यक्ती घेऊ शकत नाही. 
 

बातम्या आणखी आहेत...