Home | Maharashtra | Mumbai | hdfc bank vice president sanghvi murdered, police arrests one suspect from navi mumbai

पदाेन्नतीच्या कारणावरून एचडीएफसी बँक उपाध्यक्षाच्या हत्येचा संशय; १ जण अटकेत

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 10, 2018, 06:25 AM IST

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांचा खून झाल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी जाहीर केली.

  • hdfc bank vice president sanghvi murdered, police arrests one suspect from navi mumbai

    मुंबई- बुधवारपासून बेपत्ता असलेले एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी (वय ३९) यांची हत्या करण्यात अाल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या प्रकरणी एका संशयिताला अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिल्याचे पाेलिस सूत्रांनी सांगितले.


    दरम्यान, संघवींना मिळालेल्या पदाेन्नतीमुळे जळफळाट झालेल्या त्यांच्या सहकाऱ्यानेच सुपारी देऊन ही हत्या घडवून अाणल्याचा संशय एका वृत्तवाहिनीने पाेलिसांच्या हवाल्याने व्यक्त केला. या कटात अाणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता अाहे.


    संघवी यांची कार शनिवारी रक्ताने माखलेल्या अवस्थेत सापडली हाेती. अद्याप त्यांचा मृतदेह मिळालेला नाही. संघवी कमला मिल शाखेत होते. बुधवारी सायंकाळी ते बँकेतून बाहेर पडल्याचे सीसीटीव्हीत दिसते. मात्र ते घरी पाेहाेचले नाहीत. दरम्यान, पाेलिस कारमधील रक्ताचे नमुने संघवींच्या कुटुंबीयांशी जुळवून पाहत अाहेत. तसेच त्यांचे काॅल रेकाॅर्डही तपासत अाहेत.

    3 दिवसांपासून होते बेपत्ता रक्ताने माखलेली कार सापडली...
    > सिद्धार्थ संघवी हे मलबार हिल परिसरात कुटुंबासमवेत राहत होते. ते बुधवारी रात्री ऑफिस सुटल्यानंतर लोअर परळवरुन मलबार हिलकडे निघाले होते. ऑफिसमधून बाहेर पडताना वॉचमनने त्यांना पाहिले होते. मात्र, ते घरी पोहोचले नाही. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा फोन लावून चौकशी करण्‍याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन स्वीचऑफ येत होता.

    > यानंतर एन.एम.जोशी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास केला असता त्यांना शुक्रवारी संघवी यांची रक्ताने माखलेली कार सापडली होती. ही कार नवी मुंबईतील कोपरखैराणे परिसरात आढळली. त्याचवेळी पोलिसांना संघवी यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला होता.

Trending