आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता करता येणार नाही नवीन मोबाइल बँकिंग अॅपचा वापर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस स्पेशल - खासगी क्षेत्रातली सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँकेचे मोबाइल बँकिंग अॅप क्रॅश झाले आहे. बँकेद्वारे या अॅपला अपडेट करण्यात आले होते. 27 नोव्हेंबर रोजी या अॅपला लॉन्च करण्यात आले होते. जुन्या व्हर्जनपेक्षा हे अॅप जास्त अपडेटेड आहे. पण 24 तासांपासून हे अॅप काम करत नाहीये. ग्राहकांद्वारे या अॅपची तक्रार बँक आणि सोशल मिडीयावर करण्यात येत आहे. 

 

> सध्या बँकेने हे अॅप प्ले-स्टोर वरून हटवले आहे. नवीन व्हर्जन डाउन झाल्याने बँकिंग ट्रांजेक्शन देखील कमी झाले आहे. त्यामुळे ग्राहकांचे हित लक्षात घेऊन बँक ग्राहकांसाठी जुने व्हर्जन पुन्हा सुरू करत आहे. सुत्रांनी सांगितल्यानुसार नवीन व्हर्जनमध्ये सुधार होईपर्यंत जुने व्हर्जन लॉन्च करण्यात येणार आहे. जुने व्हर्जन मंगळवारी सुरू होण्याची शक्यता आहे.    


लॉन्चिंगच्या एका आठवड्यातच झाले क्रॅश
> HDFC बँकेने आपल्या नवीन मोबाइल बँकिंग अॅप 27 नोव्हेंबर रोजी लॉन्च केले होते. यावेळी या अॅपला 5 कोटी लोक वापरू शकतील असा दावा बँकेचे डिजीटल बँकींग कंट्री हेड नितिन चुघ यांनी केला होता. पण लॉन्चिंगच्या एका आठवड्यातच अॅप क्रॅश झाले. अॅपच्या सर्व्हरवर अतिरिक्त भार वाढल्यामुळे अॅप क्रॅश झाल्याचे सांगितले जात आहे. 


जुनेच व्हर्जन सुरू होणार
> काही मिडीया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, नवीन सुरू होईपर्यंत बँक जुने व्हर्जन सुरू शकते. सुत्रांच्या मते मंगळवार रोजी बँकेचे अॅप पुन्हा सुरू होईल आणि ग्राहकांना ते प्ले-स्टोर वरून डाउनलोड करता येईल. 


का आली अडचण?
> बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अतिरिक्त लोड आल्यामुळे सर्व्हरवर डाउन झाले आहे. बँकेची टेक्नीकल टीम यावर काम करत आहे. लवकरच अॅप आणि नेटबँकिंग सुविधेला अपडेट करण्यात येईल. बँकेचे म्हणणे आहे की, ग्राहकांना जर मोबाइल अॅप आणि नेटबँकिंगचा वापर करता येत नसेल तर त्यांनी फोन बँकिंग आणि मिस्ड कॉल बँकिंगचा वापर करावा. तसेच फंड ट्रान्सफरसाठी यूपीआईचा वापर करावा. 


बँकेने ट्विटरवर मागितली माफी

> एचडीएफसी बँकेने ग्राहकांना होणाऱ्या असुविधेबद्दल ट्विटरवर माफी मागितली आहे. ट्विट करताना लिहीले की, ज्या यूझर्सनी नवीन व्हर्जन डाउनलोड केले आहे आणि जुने डिलीट केले आहे त्यांना पुढील सुचनेपर्यंत बँकेचे मोबाइल अॅप वापरता येणार नाही. बँकेने नेट बँकिंग, पेजेप, फोन बँकिंग आणि मिस्ड कॉल बँकिंग आदी सेवांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. 

बातम्या आणखी आहेत...