आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- एचडीएफसी म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एमएफला मागे टाकत देशातील सर्वात मोठी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी बनली आहे. कंपनीने हे स्थान दोन वर्षांपेक्षा जास्त (११ तिमाही) काळानंतर मिळवले आहे. ही माहिती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाच्या (एम्फी) ताज्या आकडेवारीत समोर आली आहे. त्यानुसार एचडीएफसी एमएफ डिसेंबर तिमाहीच्या अखेरपर्यंत ३.३५ लाख कोटी रुपयांचे व्यवस्थापन करत होती, तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एमएफचा हा आकडा ३.०८ लाख कोटी रुपये होता.
ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान एचडीएफसी एमएफचे अॅसेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) या आधीच्या तिमाहीच्या तुलनेमध्ये ९ टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहे. याच दरम्यान आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एमएफचे एयूएममध्ये ०.६ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. एचडीएफसी एमएफ आॅक्टोबर २०११ पासून देशातील सर्वात मोठी अॅसेट मॅनेजर कंपनी होती. ही मार्च २०१६ पर्यंत अव्वल क्रमांकावर राहिली. त्यानंतर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एचडीएफसी एमएफला मागे टाकत देशातील सर्वात मोठी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी बनली होती, तर मासिक आधारावर विचार केल्यास फेब्रुवारी २०१६ मध्ये एचडीएफसी एमएफला मागे टाकत अव्वल क्रमांकावर पोहोचली होती.
डिसेंबरअखेरीस २३.६१ लाख कोटींचे व्यवस्थापन
देशातील म्युच्युअल फंड उद्योगामध्ये ४२ कंपन्या आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस या कंपन्या एकूण २३.६१ लाख कोटी रुपयांचे व्यवस्थापन करत होत्या. यानुसार म्युच्युअल फंड कंपन्या २०१९ मध्ये या क्षेत्रात मजबूत वाढीची अपेक्षा करत आहेत. याव्यतिरिक्त बाजार नियामक सेबीनेही अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळेदेखील म्युच्युअल फंडातील व्यवसाय वाढण्यास मदत मिळेल. म्युच्युअल फंड कंपन्या मोठ्या संख्येत गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करून तो पैसा शेअर, बाँड आणि चलन बाजारात गुंतवतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.