Home | Gossip | he look like a thief, said sonakshi sinha's grand mother after seeing shatrugn sinha

शत्रुघ्न यांच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन जेव्हा मुलीच्या घरी पोहोचले होते त्यांचे भाऊ तेव्हा पाहताच भडकल्या होत्या सोनाक्षीच्या आजी, चेहऱ्यावरील जखमांच्या खुणा पाहून समजल्या होत्या गुंड, एक कारण देऊन नाकारले होते स्थळ 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 17, 2019, 10:41 AM IST

होणाऱ्या पत्नीला पहिल्यांदा ट्रेनमध्ये भेटले होते शत्रुघ्न, 39 वर्षणापासून देत आहेत एकमेकांची साथ... 

 • he look like a thief, said sonakshi sinha's grand mother after seeing shatrugn sinha

  मुंबई : शत्रुघ्न सिन्हा काही दिवसांपूर्वी बीजेपी सोडून काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. पार्टीने त्यांना पटना साहेबमधूनच आपले उमेदवार बनवले. 1945 मध्ये जन्मलेले शत्रुघ्न सिन्हा यांनी फिल्म 'प्यार ही प्यार' (1969) ने करियरला सुरुवात केली होती. मात्र या फिल्ममध्ये काम करूनही त्यांना क्रेडिट मिळाले नव्हते. 1970 मध्ये आलेली फिल्म 'प्रेम पुजारी' मध्ये शत्रुघ्न यांनी पाकिस्तानी आर्मी ऑफिसरची भूमिका केली होती. शत्रुघ्न यांनी जुलै, 1980 मध्ये पूनम चांदिरामानी यांच्यासोबत लग्न केले होते. मात्र आधी सोनाक्षीच्या आजीने शत्रुघ्न यांचा चेहरा पाहूनच हे स्थळ नाकारले होते.

  ट्रेनमध्ये झाली होती पहिली भेट...
  पूनम यांनी सांगितले, "आम्ही पहिल्यांदा एकमेकांना पटना ते मुंबईच्या ट्रेन जर्नीदरम्यान भेटलो होतो. आमचे बर्थ समोरासमोरच होते. आम्ही दोघेही रडत होतो. शत्रुघ्न हे आपल्या आई वडिलांपासून दूर होत होते आणि माझ्या आईने मला रागावले होते. पूर्ण जर्नीदरम्यान शत्रुजी माझ्याशी बोलण्याचे कारण शोधात होते. एवढेच नाही तर एकदा त्यांनी मला स्पर्श करण्याचाही प्रयत्न केला. मग ट्रेन एका बोगद्यातून जात होती तेव्हा त्यांनी कसाबसा माझ्या पायाला स्पर्श केला. पण ते एवढे घाबरलेले होते की, ते मग पूर्ण प्रवासात एकही शबद बोलले नाहीत".

  मुलगा तर गुंडासारखा दिसतो....
  एक आणखी किस्सा शेयर करत पूनम यांनी सांगितले की, "जेव्हा शत्रुघ्न यांचे भाऊ राम सिन्हा आणि डायरेक्टर एनएन सिप्पी त्यांचे स्थळ घेऊन माझ्या घरी आले. तेव्हा आई त्यांचा फोटो पाहून भडकली आणि म्हणाली हा तर गुंडासारखा दिसतो. याच्या चेहऱ्यावर किती डाग आहेत. आई म्हणाली, कुठे माझी दुधासारखी गोरी मुलगी आणि कुठे हा मुलगा, तो पण चोराची अक्टिंग करतो. असे म्हणत आईने यांचे स्थळ रिजेक्ट केले. मात्र नंतर माझे पेरेंट्स तयार झाले होते".

  38 वर्षांपासून एकत्र आहेत शत्रुघ्न आणि पूनम...
  9 जुलै, 1980 ला शत्रु सरांनी अभिनेत्री पूनम चंदिरामानी यांच्यासोबत लग्न केले होते. ही ती वेळ होती जेव्हा शत्रुघ्न यांचे नाव रीना रायसोबत जोडले जायचे. एका इंटरव्यूमध्ये त्यांनी सांगितले होते की, रीनासोबत त्यांचे नाते 7 वर्षे होते. महत्वाची गोष्ट हीआहे की, दुसऱ्या एका इंटरव्यूमध्ये शत्रुघ्न सरांची वाइफ पूनम यांनी सांगितले होते की, त्यांना आपले पती आणि रीना यांच्या अफेयरबद्दल पूर्ण कल्पना होती.

Trending