आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • He Was Going To Commit Suicide And Lit His Last Cigarette But Heard A Strange Noise That Changed Her Life

अविश्वसनीय : आयुष्याला कंटाळून आत्महत्या करणार होता सैनिक, सिगारेटचा शेवटचा कश घेऊन स्वतःवर झाडणार तोच आला एक आवाज...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकाः आपल्या आयुष्याला कंटाळून एक अमेरिकन सैनिक आत्महत्येचा निर्णय घेतो. तो एका सुनसान ठिकाणी पोहोचतो आणि आयुष्य संपवण्यापूर्वी सिगारेट ओढतो. सिगारेटचा शेवटचा कश घेऊन तो स्वतःवर गोळी झाडणार तोच त्याला झाडाझुडपांतून एक आवाज येतो आणि तो गन खाली घेतो. हाच एक क्षण त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो.

 

समोर येते एक काळी मांजर 
- ही गोष्ट आहे जोश मरीनो नावाच्या एका सैनिकाची. जोशने 2001 मध्ये अमेरिकन सेनेत प्रवेश घेतला होता. 2007 मध्ये त्याला इराक येथे पाठवण्ता आले होते. येथे एका बॉम्ब ब्लास्टमध्ये तो जखमी झाला होता. त्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता. मानसिक रुग्ण असल्याचे सांगून त्याला सैन्यातून काढून टाकण्यात आले होते.
- विसरभोळ्या स्वभावामुळे तो आयुष्याला कंटाळला होता. डिप्रेशनमध्ये येऊन त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा तो स्वतःवर गोळी झाडणार होता, तेव्हा त्याला अचानक एक आवाज ऐकू आला. त्या आवाजाच्या दिशेने त्याचे लक्ष गेल्यानंतर त्याला समोर एक काळी मांजर दिसली. मांजर त्याच्या पायाजवळ आली. ती जणू जोशला काही सांगू इच्छिते, असे त्याला वाटले. 
- जोश मांजरीला कुरवाळत जोरजोरात रडला. त्याला रडताना बघून मांजरीने त्याच्या पायावर तिचा हात मारला, जणू तिने त्याला शांत व्हायला सांगितले. आपण चुकीचा निर्णय घेतल्याचे त्याचे लक्षात आले आणि त्याने आत्महत्या न करण्याचे ठरवले.

 

मांजरीशी जुळले भावनिक नाते...  
- आत्महत्येपासून परावृत्त करणा-या मांजरीसोबत जोशचे अनोखे भावनिक नाते जुळले. तो तिला बघून आता सगळे नैराश्य विसरु लागला. चमत्कारिक रित्या जोश बरा होऊ झाला.  
अचानक गायब झाली मांजर 
- जोश बरा झाला आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघू लागला. त्याला एक गर्लफ्रेंडही मिळाली. पण जोश बरा होताच ती मांजर अचानक गायब झाली. त्यामुळे तो अतिशय दुःखी झाला. 

 

मग घडला चमत्कार...

- काही महिन्यांनी जोश त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला. दोघांनी घरी एक मांजर पाळायाचे ठरवले. यासाठी ते दोघे एका पेट शॉपमध्ये पोहोचले. तर तिथे जोशला तिच मांजर दिसली. 
- जोश तिला पुन्हा आपल्या घरी घेऊन आला.  

बातम्या आणखी आहेत...