मुंबईपेक्षा क्रुर हल्ला / मुंबईपेक्षा क्रुर हल्ला करण्याची होती हेडलीची योजना; ओलिसांचे करणार होते शिरच्छेद

agencies

May 27,2011 09:07:00 PM IST

मुंबईपेक्षा आणखी क्रुर हल्ला झाला असता. पण, डेव्हीड हेडलीला त्यापुर्वीच अटक झाली आणि या भीषण कृत्याचा बेत फसला. हा खुलासा केला आहे डेव्हीड हेडलीने. डेन्मार्कची राजधानी कॉपनहेगन शहरामध्ये असा हल्ला करण्याची हेडलीची योजना होती. कॉपनहेगन शहरात हल्ला करुन ओलिसांना त्याब्यात घ्यायाचे, त्यांचा शिरच्छेद करायचा आणि छाटलेली मुंडकी खिडक्यांबाहेर फेकावी, अशी ही ½ायंकर योजना होती. या योजनेचा सुत्रधार इलियास काश्मिरी होता. हेडलीला स्वत: ही योजना अंमलात आणायची होती. पण, अटक झाल्यामुळे त्याचे सर्व मनसुबे उधळले. शिकागो येथे सुरु असलेल्या खटल्यामध्ये या बाबी पुढे आल्या आहेत.
इलियास काश्मिरीचे साथीदार ही योजना तडीस नेण्यास तयार नव्हते. हे सर्वजण त्यावेळी लंडनमध्ये होते आणि तिथे प्रचंड सुरक्षा व्यवस्था होती. त्याशिवाय त्यांना पुरेसा पैसाही उपलब्ध झाला नव्हता. प्रेशित मोहम्मदांचे आक्षेपार्ह छायाचित्र छापणाऱ्या वृत्तपत्रावरही हल्ला करण्याची काश्मिरीची योजना होती. त्यासाठी हेडलीला तो पैसा आणि साथीदारही देण्यास तयार होता.

X
COMMENT