आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकीदाराकडून ४०० रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापक चतुर्भुजला रंगेहाथ पकडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील आश्रमशाळेत वेतनाची बिले मंजुरीला पाठवण्यासाठी चौकीदाराकडून चारशे रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापकाला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले . 


ईश्वर रामदास महाले (वय ५५ ) असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. तक्रारदार हे आश्रमशाळेत चौकीदार म्हणून नोकरीला आहेत.त्यांचे दरमहा वेतन देयके बनवून ते मंजूर करण्याचे कामकाज मुख्याध्यापक महाले हे करतात. दि. ७ सप्टेंबर रोजी तक्रारदाराला मुख्याध्यापकाने आश्रमशाळेत बोलविले होते. सप्टेंबर २०१८ पासून पुढील सहा महिन्यांचे वेतन देयकांचे बिल दरमहा तयार करून मंजुरीसाठी पाठवण्यासाठी मुख्याध्यापकाने ३०० रूपये चौकीदाराला मागितले. त्याचबरोबर यापूर्वी अदा झालेल्या फरकाच्या रकमेचेही १०० रूपये मागितले. पैसे न दिल्यास बील मंजुरीसाठी पाठवणार नाही, असेही धमकावले. यावर पैसे दिल्याबाबत पावतीची मिळेल काय, अशी विचारणा चौकीदाराने केली असता पावती मिळणार नसल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. 


त्यानंतर दि. ८ सप्टेंबर रोजी कर्मचाऱ्यांमार्फत वेतनाच्या बिलांसंदर्भात भेटण्यासाठी मुख्याध्यापकांनी निरोप पाठविला. मुख्याध्यापक लाच मागत असल्याची खात्री झाल्यानंतर चौकीदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार शुक्रवारी पथकाने चौकीदाराकडून लाच घेताना मुख्याध्यापक महाले यांना रंगेहाथ पकडले. मुख्याध्यापाकाविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ प्रमाणे धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...