आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Headmaster Drunk On School Trip, Did Fun On Beach With Teachers, Students Scared, Angry Parents Go To School And Scolded Them

सहलीत मद्यधुंद मुख्याध्यापक, शिक्षकांसह चालकांची बीचवर मस्ती, विद्यार्थिनी भयभीत, संतप्त पालकांनी शाळेत जाऊन विचारला जाब

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

सोयगाव : येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या शैक्षणिक सहली दरम्यान मद्यधुंद मुख्याध्यापक, शिक्षक आणि बसचालकाने एका बीचवर केलेल्या मस्तीमुळे मुला-मुलींना पोलिस ठाण्यात अर्धी रात्र काढावी लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकारामुळे शिक्षण विभागाचे वाभाडे निघाले असून विद्यार्थिनींमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक आणि चालक यांनी केलेल्या कृत्यामुळे आणि मुला-मुलींना एकत्रित काही विचित्र खेळ खेळायला लावल्याने घरी आल्या आल्या पालकांना बिलगून रडलेल्या मुली अजूनही दहशतीखाली आहे.

संतप्त पालकांनी शाळेत जाऊन जाब विचारत यातील दोषींवर कारवाईसाठी सोयगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोयगाव जिल्हा परिषद हायस्कूल शाळेची शैक्षणिक सहल दि. २१ डिसेंबर रोजी सोयगाव येथून निघाली. महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळे पाहून दि.२५ रोजी संध्याकाळी दिवे आगार समुद्र किनारा पाहण्यासाठी सहल पोहोचली होती. यावेळी मुले-मुली समुद्र किनारा पाहत असताना मद्य प्राशन करू मुख्याध्यापक आनंदा इंगळे, शिक्षक ठाकूर, शिपाई चावळे यांनी मुलींना समुद्राच्या पाण्यात लोटून दहीहंडी खेळण्यास सांगितले. तसेच, मुलगा आणि मुलगी अशा कुस्त्या लावण्याचा प्रयत्न केला.

मुख्याध्यापक व शिक्षक करीत असलेल्या मस्तीमुळे भयभीत झालेल्या मुली बसकडे पळाल्या. हा सगळा प्रकार काही स्थानिकांनी कॅमेऱ्यात टिपून व्हायरल केला. स्थानिक पोलिसांनी सर्व तळीराम गुरुजींसह एसटीच्या दोघा चालकांना पोलिस ठाण्यात नेले होते. यावेळी त्या सर्वांना तीन ते चार तास बसवून समज देऊन सोडून दिले. सुरक्षिततेसाठी पोलिस काही अंतरापर्यंत बस सोबत होते. घडलेला प्रकार शुक्रवारी सर्व मुला-मुलींनी पालकांना सांगितला.

याप्रकरणी शंभराहून अधिक पालक शनिवारी शाळेत जाब विचारण्यासाठी गेले. समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे पालकांनी पोलिस ठाणे गाठत पालक बळीराम चव्हाण, भगवान सोनवणे, संदीप पगारे, किशोर फुसे, विजय राठोड यांनी तक्रार दाखल केली आहे. तसेच गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली.
मुली शाळेत आल्याच नाही : सहलीत मौजमजा आणि पर्यटन करण्यासाठी गेलेल्या मुलींना शिक्षकांच्या विचित्र वागण्याचा चांगलाच धक्का बसला आहे.


सोयगाव येथील जि. प. हायस्कूलच्या सहलीत दारू पिऊन घडलेल्या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी शाळेत जमलेले संतप्त पालक.

चालकांनी मद्यसेवने केले, अाम्ही नाही

दरम्यान, घडलेल्या या प्रकाराबद्दल मुख्याध्यापक आनंदा इंगळे यांना विचारले असता एस टी बसेसचे ड्रायवर दारू पिलेले होते, आम्ही पिलो नव्हतो. त्यांच्यामुळे पोलिस ठाण्यात जावे लागले. ड्रायव्हर यांची चूक माफ करण्यासाठी पोलिस स्टेशनला कान धरून बैठका मारल्या असल्याचे दस्तुरखुद्द मुख्यध्यापक इंगळे यांनी सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...