आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

तुमच्या डोकेदुखीचे कारण हेड फोन तर नाही ना?

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या कानांमध्ये हेडफोन किंवा इअर फोन लावणे तरुणांना खूप आवडते. याचा तासन‌‌्तास वापर करताना आपण हे विसरतो की यामुळे तुमच्या कानांसह शरीरालाही नुकसान होऊ शकते. कित्येकदा तर कमी वयातच बहिरेपणा देखील येतो.

हृदयासंबंधी समस्या
मोठ्या आवाजात गाणी ऐकणे कानांसोबत हृदयालाही नुकसानदायी होऊ शकते. माेठ्या आवाजात गाणी ऐकल्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि ते सामान्य गतीने वेगाने चालतात. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. याशिवाय हे कॅन्सरमुळेही होऊ शकते. जे लोक इअरफोन शेअर करता, त्यात इंफेक्शनचा धोका दुपटीने होऊ शकतो.

कमी ऐकू येणे
इअरफोन आणि हेडफोनच्या सततच्या मोठ्या आवाजामुळे संगीत ऐकल्यामुळे अगोदर कानांवर परिणाम होतो. यामुळे कानातील बॅक्टेिरयांची संख्या दुप्पट वेगाने वाढते. खरंतर कानाची ऐकण्याची क्षमता ९० डेसिबलची असते परंतु सतत ऐकल्यामुळे हळूहळू ४० ते ५० डेसिबलपर्यंत कमी होऊन जाते. यामुळे दूरचा आवज ऐकू येत नाही. याच कारणामुळे बहिरेपणा येतो. म्हणून तुम्हाला कधीही ९० डेसिबलपेक्षा जास्त आवाजात गाणी ऐकू नका.

डोकेदुखी किंवा झोप न येणे 
हेडफोन आणि इअरफोन मधून निघणारे विद्युत चुंबकीय लहरींमुळे मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो.याच कारणामुळे इअरफोनच्या अधिक वापरामुळे तुम्हाला डोकेदुखी किंवा झोप न येण्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकता. रस्त्यावरुन चालताना इअरफोन लावू नका अपघात होण्याची शक्यता वाढू शकता.