आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटाणे खा वजन कमी करा, पोटाच्या समस्याही दूर होतील

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाटाण्यातील अनेक पोषक द्रव्ये आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहेत. वजन कमी करण्यापासून ते प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचे सेवन करावे.

कमी होईल वजन - वाटाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळते. सोबतच कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे याच्या सेवनाने पोट लवकर भरते आणि वारंवार भूक लागल्याची जाणीव होत नाही. भाजी, पराठे किंवा सॅलड रूपात याचे सेवन करता येईल. तळलेले वाटाणे खाण्याऐवजी ते उकळून खाणे अधिक फायद्याचे ठरेल.

वाढेल प्रतिकारशक्ती - वाटाण्यात मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम आढळते. फूड एक्सपर्टच्या मते, मॅग्नेशियम शरीराची प्रतिकार क्षमता वाढवण्यात सहायक असते. त्यामुळे याच्या नियमित सेवनाने आजारांशी सामना करण्यास मदत मिळेल, असे म्हणता येईल.

हाडे होतील बळकट - यामधील सेलेनियम हाडे बळकट बनवण्यामध्ये सहायक ठरते. यामुळे आर्थरायटिस आजारापासून बचाव करण्यातही मदत होते. त्यामुळे वाटाणे सांधेदुखीमध्ये तुमची मदत करू शकतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे. तसेच यामुळे कोलेस्ट्रॉलवरही नियंत्रण मिळवता येते.

चांगली राहील पचनक्रिया - वाटाण्यात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांचे चांगले प्रमाण आढळून येते. यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. तुम्हाला मलावरोध किंवा अपचनाची समस्या असेल तर मर्यादीत प्रमाणात वाटाणे खा. पोटाची समस्या दूर होईल.

बातम्या आणखी आहेत...