आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायरॉइड, अॅसिडिटी अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरु शकतात हस्त मुद्रा, होतात अनेक फायदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हस्त मुद्रा हा योगासनाचा महत्त्वाचा भाग आहे. यामुळे मेंदू तल्लख होतो. तसेच यकृत आणि हाडे बळकट होण्यासोबतच थायरॉइड आणि अॅसिडिटीमध्येही हस्त मुद्रा करणे फायदेशीर ठरते. योग तज्ज्ञ दीप्ती गामी हस्तमुद्रेचे फायदे सांगणार आहेत. 

 

1. ज्ञान मुद्रा 
दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि सोबत आपल्या हातांचे पंजे पूर्णपणे उघडा. आता तर्जनीला आपल्या अंगठ्याने स्पर्श करा आणि उर्वरित बोटे तशीच सरळ खुली सोडा. 


फायदा :
- मेंदू तल्लख होतो. स्मरणशक्ती वाढते. 
- त्वचा विकारांसाठी ही मुद्रा प्रभावी आहे. 
- ही मुद्रा वजन कमी करण्यातही फायदेशीर आहे. 

 

2. वायू मुद्रा 
दोन्ही हातांच्या तर्जनी अंगठ्याच्या खाली ठेवा. अंगठ्याने तर्जनीला हळूच दाबा. 


फायदा :
- अॅसिडिटीमध्ये फायदा होईल. 
- पाठदुखी आणि स्पाँडिलेसिसमध्ये प्रभावी. 
- यामुळे व्हेरिकाेज व्हेन्स कमी करण्यास होते. 

 

3. पृथ्वी मुद्रा 
जमिनीवर पद्मासनात बसा. आता तर्जनीने अंगठ्याला स्पर्श करत हळूच दाबा. उर्वरित तिन्ही बोटे वरच्या दिशेने सरळ ताठ ठेवा. 


फायदा :

- ही मुद्रा हाडे आणि स्नायूंना बळकट करते. 
- यामुळे अशक्तपणा दूर होतो, ऊर्जा मिळते. 
- यामुळे चेहरा उजळतो. 

 

4. सूर्य मुद्रा 
दोन्ही हातांचे पंजे गुडघ्यांवर ठेवा. आता आपल्या हातातील सूर्य असलेले बोट खालच्या दिशेने वाकवा आणि त्याला अंगठ्याने दाबा. 


फायदा :
- जास्त थंडी वाजणाऱ्या व्यक्तीसाठी उपयुक्त. 
- यकृताची समस्या दूर होऊ शकते. 
- थायरॉइडच्या उपचारामध्ये परिणामकारक. 

 

बातम्या आणखी आहेत...