हेल्थ टिप्स / हिवाळ्यात गुळाचा चहा घेतल्याने होतील हे खास आरोग्य लाभ

गुळाचा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे

दिव्य मराठी

Dec 10,2019 12:15:00 AM IST

गुळाचा चहा साखरेच्या सामान्य चहाप्रमाणाचे असतो, फरक फक्त एवढाच आहे की, या चहामध्ये साखरेऐवजी गुळ टाकला जातो. गुळाचा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात गुळाचा चहा घेतल्यास शरीरातील विविध आजार नष्ट होण्यास मदत होते.

  • रक्त वाढते

रक्तविकार असलेल्या लोकांनी गुळाचा चहा घेतल्यास अवश्य फायदा होईल. गुळाचे सेवन शरीरातील रक्त स्वच्छ होते तसेच मेटाबॉल्जिम ठीक राहण्यास मदत मिळते. गुळ रक्तामध्ये लगेच मिसळत नाही आणि यामुळे साखरेच्या तुलनेत गुळ जास्त आरोग्यवर्धक आहे.

  • सर्दी आणि कफ दूर होतो

गुळ हा उष्ण पदार्थ असल्यामुळे याचे सेवन सर्दी आणि कफमध्ये आराम देते. सर्दीमुळे नाक बंद झाले असल्यास गुळाचा चहा अवश्य घ्या, आराम मिळेल.

  • विषारी पदार्थांपासून मुक्ती

गुळ शरीरातील विषारी घटक नष्ट करण्यास मदत करतो. थंडीमध्ये शरीरातील तापमान नियमित ठेवण्यास गुळ सहायक ठरतो. गुळाचा चहा घटल्याने गळा आणि फुप्फुसामध्ये झालेला संसर्ग दूर होतो.

  • थकवा आणि कमजोरी दूर होते

खूप जास्त थकवा आणि कमजोरी जाणवत असल्यास गुळाचा चहा घेतल्याने तुमची एनर्जी लेव्हल वाढेल. गुळ लवकर पचतो आणि यामुळे साखरेचा स्तरही वाढत नाही. दिवसभर काम करून थकल्यासारखे वाटल्यास लगेच गुळाचा चहा अवश्य घ्या.

X
COMMENT