आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबाच्या घरात हॉस्पिटलपेक्षा जास्त गर्दी पाहून हैराण झाले पोलिस, त्यांना कळत नव्हते महिला इतक्या संख्येने का येतात, त्यांनी एक शक्कल लढवली आणि समोर आले सत्य...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अम्बाला(हरियाणा)- विभागीय टीमने छापा मारला तेव्हा बाबाचे क्लिनीक दोन रूममध्ये चालत होते. थाअम्बाला/नारायणगड आरोग्य विभागाच्या टीमने फतेहगडमध्ये आपल्या घरात देसी औषधे देऊन मुलगा होईल असा दावा करणाऱ्या बाबा सुरेंद्र गिरीच्या क्लिनीकवर रेड मारली. रेड मारली तेव्हा लोकांची अफाट गर्दी पाहून पोलिसदेखील हैराण झाले. टीमला पाहताच पेशंट चकित झाले, अनेकांनी तेथून पळ काढला. 


अशी मिळाली माहिती
कुरुक्षेत्रचे डिप्टी सिव्हील सर्जन डॉ. राजिंद्र कुमार सहाय यांना गुप्त सुचना मिळाली होती की, अम्बालाच्या फतेहगड गावात देशी औषधे देऊन मुलगा होण्याचा दावा केला जात आहे. याची सुचना अम्बाला सिव्हील सर्जन डॉ. संतलाल वर्मा यांना देण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार- अम्बाला-कुरुक्षेत्र आरोग्य विभागाच्या टीमने बाबाकडे एक खोटा पेंशंट पाठवला. महिला बाबाकडून औषध घेऊन परत आल्यावर टीमला खात्री पटली की, हे प्रकरण खरे आहे. त्यानंतर त्यांनी छापा मारला. त्यानंतर औषधांसोबत बाबाला ताब्यात घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...