आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत आरोग्य विमा अनिवार्य, ३५ हजार भारतीयांवर परिणाम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- येत्या तीन नोव्हेंबरपासून अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांच्या उपचारांवर सरकारचा पैसा खर्च होणार नाही, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. ट्रम्प यांनी शुक्रवारी या आदेशावर स्वाक्षरी केली. याचा थेट परिणाम यंदा अमेरिकेत जाणाऱ्या ३५ हजार भारतीयांवर होणार आहे. यापैकी आठ हजार जण अमेरिकेत पोहोचलेही आहेत. 


व्हाइट हाऊसचे वरिष्ठ अधिकारी डो रँड यांनी सांगितले की, आता यंदा अमेरिकेत येणाऱ्या २७ हजार भारतीयांना आरोग्य विमा संरक्षण घ्यावे लागेल. कारण, सरकारने त्यांच्यावरील उपचारांचा खर्च केला तरी ती रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाईल. आरोग्य विमा संरक्षण नसल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. हा आदेश जारी केल्यानंतर ट्रम्प म्हणाले की, बिगर अमेरिकींच्या उपचारांवर आमच्या करदात्यांचा पैसा खर्च करणार नाही.

कारण : १५% स्थलांतरित, ६०% अमेरिकी विमा उतरवतात
सरकारनुसार, ६० टक्के अमेरिकी नागरिक आणि १५ टक्के स्थलांतरित आरोग्य विमा घेतात. अमेरिकेत कायम वास्तव्यास येणाऱ्यांपैकी ८५ टक्के विदेशी नागरिक आरोग्य विमा संरक्षण घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्या उपचारांचा खर्च सरकारला उचलावा लागतो. आरोग्य विमा संरक्षण नसलेल्यांवर दरवर्षी २.४७ लाख कोटी रुपये यासाठी खर्च होतात. त्यामुळे सरकारने हा कडक निर्णय घेतला आहे.

अमेरिकेत दाखल झाल्यानंतर महिन्यात पुरावा द्यावा लागेल
अमेरिकी सरकारने स्पष्ट केले की, आरोग्य विमा नसल्यास कोणाचाही व्हिसा रोखला जाणार नाही, मात्र अमेरिकेत दाखल झाल्यानंतर एक महिन्याच्या आत आरोग्य विमाचा पुरावा स्थानिक प्रशासनाला दाखवावा लागेल. 

विमा नसल्यास बँक बॅलन्स उपचार होतील इतके असावे
व्हाइट हाऊसचे अधिकारी डो रँड यांनी सांगितले, आरोग्य विमा नसेल तर अमेरिकी व्हिसाधारकांना बँक बॅलन्स नमूद करावा लागेल. त्यांच्याकडे एवढा पैसा असावा की त्यातून सहज उपचार करता येतील. 

निर्वासित कोटा कमी केला, फक्त १८ हजार एंट्री मिळतील 
ट्रम्प प्रशासनानुसार, २०१९-२०२० या आर्थिक वर्षात फक्त १८ हजार निर्वासितांनाच शरण देण्यात येईल. या कार्यक्रमांतर्गत अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात कमी संख्या आहे. आरोग्य विमा हेच यामागचे कारण असल्याचे सांगण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...