Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | health tips for tiredness

थकवा का येतो हे माहीत आहे काय? 

दिव्य मराठी | Update - Mar 14, 2019, 12:02 AM IST

तज्ज्ञांच्या मते नेहमी थकवा येणे हे अनेक आरोग्य समस्यांचे संकेत असू शकतात. कसे ते जाणून घ्या... 

  • health tips for tiredness

    थोडेसे कष्टाचे काम करताच दम लागतो? पायऱ्या चढताना-उतरताना त्रास होतो? वजनदार सामान उचलण्यास घाबरता? याचा अर्थ तुम्ही लवकर थकता. तज्ज्ञांच्या मते नेहमी थकवा येणे हे अनेक आरोग्य समस्यांचे संकेत असू शकतात. कसे ते जाणून घ्या...


    हृदयाशी संबंधित समस्या
    शारीरिक थकवा आणि हृदयाशी संबंधित समस्या यांचा एकमेकांशी संबंध आहे. हृदयरोगाने पीडित असलेल्या लोकांवर करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, त्यांच्यापैकी ७० टक्के लोकांनी नेहमी थकवा जाणवत असल्याबाबत दुजोरा दिला आहे. आर्टरीजमध्ये होणारा रक्तप्रवाह बाधित झाल्यामुळेही असे होऊ शकते.


    थायरॉइडशी संबंधित समस्या
    ३० ते ४५ वर्षांच्या मध्यम वयाच्या महिला व पुरुषांना अनेक वेळा थायरॉइड ग्रंथींच्या सामान्यापेक्षा कमी सक्रियतेमुळेही अधिक थकवा जाणवू शकतो. या ग्रंथी गळ्यात असतात आणि टी ३ व टी ४ हार्मोन सक्रिय करतात. यामध्ये कमतरता आल्याने वजन वाढणे, खूप थंडी वाजणे, मलावरोध, त्वचा रुक्ष होणे आणि केस गळणे यांसारख्या समस्या उद्भवतात.

    लिव्हरशी संबंधित समस्या
    जर हानिकारक व्हायरसमुळे लिव्हरला इजा पोहोचत असेल तर पीडितास नेहमी थकवा येऊ शकतो. लिव्हरची कार्यप्रणाली असामान्य होणे किंवा एखादा संसर्ग झाल्यावरच ही स्थिती निर्माण होते.


    रक्ताची कमतरता
    जेव्हा शरीरात लोहाची कमतरता असते तेव्हा व्यक्तीच्या शरीरात रक्ताची कमतरता जाणवते. साधारणत: मासिक पाळी, गर्भावस्था आणि बाळाला स्तनपान करणाऱ्या महिलांना ही समस्या झेलावी लागते. अशा वेळी अॅनिमिक होण्याची शक्यताही वाढते. याशिवाय मधुमेह असलेल्यांच्या शरीरात ब्लड शुगरच्या अनियमिततेमुळेही थकवा जाणवू शकतो.

Trending