Home | Maharashtra | Vidarva | Akola | Health worker's death due to lack of Treatment

वेळीच उपचार न झाल्याने आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू; काही काळ काम बंद आंदोलन

प्रतिनिधी | Update - Sep 01, 2018, 12:49 PM IST

येथील सामान्य रुग्णालयात तेथीलच एका कर्मचाऱ्याचा मृत्यू आज शुक्रवार ३१ ऑगस्ट रोजी आपल्या कामावर असतानाच झाल्याची घटना घड

 • Health worker's death due to lack of Treatment

  बुलडाणा- येथील सामान्य रुग्णालयात तेथीलच एका कर्मचाऱ्याचा मृत्यू आज शुक्रवार ३१ ऑगस्ट रोजी आपल्या कामावर असतानाच झाल्याची घटना घडली. या प्रकरणी मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाइकांनी डॉक्टरांनी लवकर निदान न केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला अाहे. दरम्यान, या घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी काही वेळाकरता काम बंद आंदोलन केले होते.


  जिल्हा सामान्य रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी चंद्रशेखर राजाराम जाधव वय ४० नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजता कामावर रुजू झाले. मात्र काही वेळानंतर छातीत दुखू लागल्याने त्यांना तेथेच भरती करण्यात आले. यावेळी कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी सुनील राजपूत यांनी माहिती दिल्यानंतरही लवकर चंद्रशेखर जाधव यांच्यावर उपचार केले नाही.


  अर्धा ते पाऊण तासानंतर डॉक्टर आले. मात्र तोपर्यंत चंद्रशेखर यांची प्राणज्योत मालवली होती. या घटनेमुळे मृत चंद्रशेखर जाधव यांचे नातेवाईक तसेच सामान्य रुग्णालय चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे उपस्थित निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्लम यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच दोषी डॉक्टर सुनील राजपूत यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान सामान्य रुग्णालयात तणावाची स्थिती निर्माण झाल्यामुळे शहर पोलिसांनी तत्काळ पोहोचून परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही. मृत कर्मचाऱ्याचे शवविच्छेदन दुपारी करण्यात आले. उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झालेली नव्हती.


  दोषींवर कारवाईची संघटनेतर्फे मागणी
  त्यानंतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश तोंडिलायता यांनी तसेच आपचे शहर संयोजक शेख इरफान शेख बुढन, प्रशांत विजयराव मोरे, अॅड.दिलीप मापारी, सलीमखाँ पठाण, सुनील मोरे आदींनी जिल्हाधिकारी यांचेकडे एका निवेदनाद्वारे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी आता सामान्य रुग्णालय प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले.

Trending