Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Healthy diet plan for fasting during Shravan shravan

जाणून घ्या, श्रावणात काय खावे आणि काय टाळावे? ज्यामुळे आरोग्य राहील उत्तम

हेल्थ डेस्क | Update - Aug 24, 2018, 12:02 AM IST

श्रावण महिना सुंदर असतो, परंतु या काळात आजार होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी डॉक्टर या महिन्यात खाण्यापिण्याकडे विशेष

 • Healthy diet plan for fasting during Shravan shravan

  श्रावण महिना सुंदर असतो, परंतु या काळात आजार होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी डॉक्टर या महिन्यात खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला देतात. या महिन्यात कोणते पदार्थ खाणे चांगले आणि काय खाणे हानिकारक याविषयी आज आम्ही सांगत आहोत...


  श्रावणात काय खाऊ नये
  तेलकट पदार्थ :
  आयुर्वेदानुसार श्रावण महिन्यात जास्त जड, तेलकट आणि गार पदार्थ खाऊ नयेत.


  पालेभाज्या : या काळात पालेभाज्यांमध्ये बॅक्टेरिया आणि जीवजंतू जास्त असतात. हे खाल्ल्याने पोटाचे आजार होण्याची शक्यता असते.


  वांगी : या काळात वांग्यांमध्ये किडे जास्त असतात. पचनशक्ती कमजोर झाल्यामुळे वांग्यांमुळे गॅस तयार होण्याची शक्यता जास्त असते.


  दही : हे गार असल्यामुळे हानिकारक ठरू शकते. सर्दी-पडसे, गळ्याशी संबंधित आजार होऊ शकतात.


  दूध : या वातावरणात दूध प्यायल्याने गॅस आणि पोटदुखीचा आजार होण्याची शक्यता जास्त असते.


  जास्त तळलेले आणि हेवी : या वातावरणात पाचनशक्ती कमजोर राहते. यामुळे जास्त तेलकट आणि जड पदार्थ खाऊ नये.


  श्रावण महिन्यात काय खावे?
  गरम पदार्थ :
  आयुर्वेदानुसार या महिन्यात लवकर पचन होणारे, ताजे आणि गरम पदार्थ खावे.


  दुधी भोपळा-दोडके : या महिन्यात दुधी भोपळा, दोडके, टोमॅटोसारखे लवकर पचन होणाऱ्या आणि वेलीवर येणाऱ्या भाज्या खाव्यात.


  हरड : आयुर्वेदानुसार या वातावरणात हरड खाल्ल्याने पोटाच्या आजारांपासून बचाव होतो.

 • Healthy diet plan for fasting during Shravan shravan

  मूग आणि धान्य : श्रावणात जुने तांदूळ, गहू, मका, मोहरी, मूग तूरडाळ यांसारखे धान्य खावे. 


  फक्त गरम पदार्थ : या वातावरणात गरम आणि ताजे पदार्थ, हॉट ड्रिंक्स जास्त घ्यावेत. 

 • Healthy diet plan for fasting during Shravan shravan

  सफरचंद-केळीसारखे पदार्थ : आयुर्वेदानुसार श्रावण महिन्यात सफरचंद, केळी, डाळिंब, नाशपती, जांभूळ, आंब्यासारखी मोसमी फळे खावीत. 

Trending