Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Hearing about chimni in the High Court

चिमणी : स्थगिती घेतली पण पर्यायी व्यवस्था काय केली?

प्रतिनिधी | Update - Aug 03, 2018, 11:59 AM IST

उच्च न्यायालयाने पर्यायी व्यवस्था करण्यासाठी स्थगिती घेतली पण पर्यायी व्यवस्था काय केली? असा जाब विचारला आहे.

  • Hearing about chimni in the High Court

    सोलापूर- उच्च न्यायालयाने पर्यायी व्यवस्था करण्यासाठी स्थगिती घेतली पण पर्यायी व्यवस्था काय केली? असा जाब विचारला आहे. याबाबत भारतीय विमानतळ प्राधिकरण, राज्य शासन, सिद्धेश्वर कारखाना व्यवस्थापन यांनी न्यायालयात पर्यायी व्यवस्थेबाबत ठोस असे काहीच सादर न केल्याबाबत खेद व्यक्त केला आहे. यावर आज शुक्रवारी उच्च न्यायालयात चिमणी प्रश्नी सुनावणी होईल.


    या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याशी व्हीसीद्वारे चर्चा केली. विमान सेवा सुरू होण्याबाबत असलेल्या अडचणीबाबत जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली.सोलापूर विमानसेवेबाबत मुख्य सचिव जैन यांनी आढावा घेऊन माहिती घेतली. सुनावणीनंतर यावर तोडगा निघेल.


    न्यायालयाने व्यक्त केला खेद...
    याप्रकरणी कारखाना प्रशासनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर २३ जुलै रोजी न्यायमूर्ती एस.सी. धर्माधिकारी व श्रीमती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सिद्धेश्वर कारखाना व्यवस्थापनाने पर्यायी व्यवस्था करण्यासाठी स्थगिती घेतली, पण कोणती पर्यायी व्यवस्था केली ? चिमणीबाबत सद्यस्थिती काय आहे ? हे न्यायालयासमोर आणले नसल्याने खेद व्यक्त केला.

Trending