आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय-मशिदीत नमाज पठण.. प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्याची गरज नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मशिदीत नमाज पठण करणे इस्लामचा अविभाज्य भाग आहे की नाही.. याबाबतचे प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. 1994 च्या  घटनापीठाच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची गरज नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.  यापूर्वीच्या निर्णयात असे म्हटले होते की, मशिदीमध्ये नमाज पठन करणे हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही. या निर्णयानंतर अयोध्या प्रकरणी निकालाचा मार्ग मोकळा झाला असून, 29 ऑक्टोबरपासून त्यावरील सुनावणी सुरू होणार आहे.  

 

सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा..

- मशिदीतील नमाजाचे प्रकरण मोठ्या पीठाकडे पाठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. 
- सरकार मशिदीच्या जमिनीचे अधिग्रहण करू शकते, या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. 
- हे प्रकरण अयोध्या जमीन वादापेक्षा वेगळे आहे. 
- तीन न्यायाधीशांच्या पीठापैकी दोन न्यायाधीशांच्या बहुमतानुसार निर्णय.  
- जस्टीस अब्दुल नजीर यांचे मते इतर दोन जजेसपेक्षा वेगळे. 

 

 

सुप्रीम कोर्टाच्या मशिदीसंबंधीच्या निर्णयाचा थेट परिणाम अयोध्या वादाच्या प्रकरणावर पडण्याची शक्यता आहे. 1994 मध्ये  सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, नमाज पठण कुठेही करता येते. त्यासाठी मशीद गरजेची नाही. तेव्हा कोर्टाने म्हटले होते, सरकारला हवे असल्यास ते मशीद असलेल्या भागाला ताब्यात घेऊ शकतात. 

 
हायकोर्टाने दिला होता जमिनीचे तीन समान भाग करण्याचा आदेश 

अलाहाबाद हाईकोर्टाने अयोध्येतील 2.7 एकर वादग्रस्त जमीनीचे तीन समान भागात वाटप करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाने म्हटले होते, एक भाग सुन्नी वक्फ बोर्डाला दिला जावा. दुसऱ्या भागाचा मालकी हक्क निर्मोही आखाड्याला मिळावा आणि तिसरा रामलला विराजमानच्या पक्षाला. 

 

बातम्या आणखी आहेत...