आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hearing In The Supreme Court Is On December 18 On Nirbhaya Case Accused's Death Of Sentence , Akshay's Reconsideration Petition Is In Court, , The Court Avoids Hearing

निर्भया हत्याकांडातील दोषींच्या फाशीवर 18 डिसेंबरला निर्णय, अक्षयची फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टात, कोर्टाने सुनावणी टाळली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निर्भयाच्या आईने पतियाळा हाऊस कोर्टाबाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. - Divya Marathi
निर्भयाच्या आईने पतियाळा हाऊस कोर्टाबाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

नवी दिल्ली : निर्भया हत्याकांडातील चारही दोषींना फासावर केव्हा लटकवायचे याचा निर्णय आता १८ डिसेंबरला होईल. डेथ वॉरंट जारी करण्यावर शुक्रवारी पतियाळा हाऊस कोर्टात सुनावणी होती. मात्र अक्षय या दोषीची फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याने सुनावणी १८ डिसेंबरपर्यंत टळली. निर्भयाची आई आशादेवी म्हणाल्या की त्या सात वर्षांपासून लढत आहेत. आणखी एक आठवडा प्रतीक्षा करू शकतात. अक्षयच्या फेरविचार याचिकेवर सुप्रीम कोर्टात १७ डिसेंबरला सुनावणी होईल. दरम्यान, निर्भयाच्या आईने सुप्रीम कोर्टातही धाव घेतली आहे. कोर्ट १७ तारखेला त्यांचीही बाजू ऐकेल. दुसरीकडे, निर्भयाच्या चारही दोषींना देण्यात येणाऱ्या फाशीचे थेट प्रसारण व्हावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका वकील संजीव कुमार यांनी सुप्रीम कोर्टात केली आहे. यामुळे देशभरातील नराधमांना आणि असे कृत्य करणाऱ्यांपर्यंत कडक संदेश जाईल. दोषींच्या फेरविचार याचिका, दयेचे अर्ज यावर एक महिन्याच्या आत निर्णय घेऊन त्यांना लवकरात लवकर फाशी द्यावी, अशी मागणी या याचिकेत आहे.

कोर्ट रूम लाईव्ह...  

डेथ वॉरंटमध्ये कसलीही अडचण नाही : दिल्ली पोलिस

हे तर कोर्टाला टाइमलाइन दिल्यासारखे होईल : न्यायमित्र

दोषींना लवकर फाशी देण्यासंबंधी निर्भयाच्या आई-वडिलांच्या याचिकेवर अतिरिक्त सेशन न्या. एस. के. अरोरा यांनी सुनावणी केली. वाचा कोर्ट रूमची कार्यवाही लाइव्ह...

ए.पी.सिंह (दोषींचे वकील) : घटनेच्या वेळी पवन अल्पवयीन होता. हायकोर्टात याचिका प्रलंबित आहे.

न्या. अरोरा : तुम्ही प्रकरण ताणता आहात. फाशीच्या शिक्षेवेळीच हायकोर्टाकडे त्याला अल्पवयीन घोषित करण्याची मागणी करायची होती. आता हायकोर्टात का गेलात ?

वृंदा ग्रोव्हर (न्यायमित्र) : अक्षयच्या फेरविचार याचिकेवर १७ डिसेंबरला सुनावणी आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत सुनावणी टाळायला हवी.

दिल्ली पोलिस : डेथ वॉरंट जारी करण्यात काही अडचण नाही. हायकोर्टाला वाटल्यास त्याची मुदत वाढवता येईल. दोषी हायकोर्टात तशी मागणी करू शकतात.

ग्रोव्हर : डेथ वॉरंट जारी करणे म्हणजे सुप्रीम कोर्टाला मुदत देण्यासारखे होईल. असे होऊ नये.

न्या. अरोरा : सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण होईपर्यंत डेथ वॉरंट जारी करता येणार नाही. फेरविचार याचिका निकाली लागेपर्यंत वाट पाहावी लागेल.

इकडे हैदराबादेत..


व्हेटरनरी महिला डॉक्टरवरील अत्याचार व जाळून हत्येप्रकरणी डॉक्टरांचा डीएनए अहवाल आला असून यात जळालेला मृतदेह त्याच महिला डॉक्टरचा असल्याचे सिद्ध झाले आहे. शिवाय घटनास्थळी सेमिनलचे डाग एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या चार आरोपींचेच असल्याचेही स्पष्ट झाले आहे.


व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चारही दोषींची हजेरी, न्यायाधीश येण्यापूर्वी एक तास आपसांत गप्पा मारताना दिसले, अक्षय ठाकूर सर्वात बेचैन दिसला


मुकेश, पवन आणि अक्षय हे तिघे एकत्र आणि दुसऱ्या तुरुंगातून विनय सकाळी १० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स रूममध्ये आले. न्यायाधीश येण्याच्या एक तास आधी तिघे एकमेकांत गप्पा मारताना दिसले. मुकेश आणि पवन तणावरहित दिसले तर अक्षय बेचैन होता. ११ वाजता न्यायाधीशांनी दोषींना नाव आणि त्यांच्या वकिलाबाबत विचारणा केली.

शुक्रवारी अक्षय आणि पवन यांनी तुरुंग प्रशासनाच्या अनुमतीने कुटुंबीयांशी फोनवर चर्चा केली. अक्षयने आपल्या पत्नीशी ५ ते ६ मिनिटे तर पवनने आईशी पाच मिनिटांपर्यंत चर्चा केली.