आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hearing On Black deer Hunting Is Held On Today, Salman Khan's Bail May Be Cancelled If He Doesn't Go To Court

काळवीट शिकारप्रकरणी सलमानची आज होणार सुनावणी, न्यायालयात न पोहोचल्यास रद्द होऊ शकतो जामीन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या समस्या बिग बॉस सुरु होण्यापूर्वी खूप वाढल्या आहेत. 13 वे सीजन होस्ट करण्यापूर्वी सलमानला  आज जोधपुर कोर्टात हजर व्हायचे आहे. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश चंद्र कुमार सोंगारा यांनी चार जुलैला सुनावणी दरम्यान सलमान खानला 27 सप्टेंबरला कोर्टात हजर हजर होण्याचे निर्देश दिले होते. असे न केल्यास सलमानचा जामीनदेखील रद्द होऊ शकतो. सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या सुरक्षिततेची संपूर्ण व्यवस्था केली आहे. सलमान मागच्यावेळी जोधपुर ग्रामीण जिल्हा आणि सेशन कोर्टात हजर झाला नव्हता आणि त्याने यासाठी माफीचा अर्जही केला होता. त्याच्या या वर्तनानंतर कोर्टाने त्याला फटकारत सांगितले होते की, पुढच्यावेळी असे झाल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.  

काय आहे प्रकरण..
1998 मध्ये सिनेमा 'हम साथ-साथ हैं'च्या शूटिंगदरम्यान सलमान याने जोधपूरमध्ये काळवीटाची शिकार केल्याचा आरोप होता. याप्रकरणी सेशन कोर्टाने सलमानला दोन प्रकरणात दोषी ठरवले होते. भवाद काळवीट शिकारप्रकरणी 1 वर्षाची, तर घोडाफार्म काळवीट शिकारप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. सलमानने सेशन कोर्टाच्या निर्णयाला जोधपूर खंडपीठात आव्हान दिले होते. खंडपीठाने या दोन्ही प्रकरणांत सलमानची निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान, यापूर्वी वांद्रे येथील हिट अॅण्ड रन प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली होती.   

सलमानविरुद्द काळवीट प्रकरणात होत्या या चार केसेस,
1) भवाद गांव केस
: 27 सप्टेंबर 1998 रोजी सलमानने भवाद गाव येथे काळवीटाची शिकार केली होती. प्रकरणात सीजेएम कोर्टाने 17 फेब्रुवारी 2006 रोजी सलमानला दोषी ठरविले होते आणि एका वर्षाची शिक्षा सुनावली होती. हायकोर्टाने या प्रकरणात सलमानची सुटका केली होती. राज्य सरकारने या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात अपील केली आहे.

2) घोडा फार्म हाउस केस : 28 सप्टेंबर 1998 रोजी सलमानने घोडा फार्म हाऊसजवळ दोन काळवीटांची शिकार केली होती. 10 एप्रिल 2006 रोजी सीजेएम कोर्टाने सलमानला 5 वर्षाची शिक्षा सुनावली. सलमान या निर्णयाविरोधात हायकोर्टात गेला आणि 25 जुलै 2016 रोजी त्याची मुक्तता करण्यात आली. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील केली आहे.

3) आर्म्स केस : काळवीट शिकार प्रकरणात वन अधिकाऱ्यांनी सलमानच्या हॉटेल रुममधून 0.0.32 बोरची रिवॉल्वर 0.22 बोरची रायफल जप्त केली. 18 जानेवारी 2017 रोजी कोर्टाने सलमानची मुक्तता केली. राज्य सरकारने या निर्णया विरोधात हायकोर्टात अपील केली आहे.

4) कांकाणी गाव केस : 2 ऑक्टोबर 1998 रोजी सलमानने कांकणी गावात दोन काळवीटांची शिकार केली. या प्रकरणात तब्बू, सोनाली बेंद्रे, सैफ अली खान आणि नीलम हे आरोपी होते. यांच्यावर सलमानला शिकारीसाठी उकसवण्याचा आरोप लावण्यात आला. 5 एप्रिल 2018 रोजी सलमान सोडून इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...