आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Hearing That Garbage Is No Longer Flowing From 12 Colonies Of Indore, Amitabh Bachchan Said: 'I Want To See A City Like This ...'

इंदूरच्या 12 कॉलनीमधून आता कचरा निघत नाही, हे ऐकून अमिताभ बच्चन म्हणाले - 'असे शहर मी पाहू इच्छितो...' 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बुधवारी ‘कौन बनेगा करोडपती’द्वारे देशाला पुन्हा एकदा कळाले की, कसे इंदूर शहर स्वच्छतेच्या बाबतीत सलग तिसऱ्यांदा पहिल्या नंबरवर आहे. गांधी जयंतीच्या निमित्ताने प्रसारित झालेल्या या विशेष एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर इंदूर महानगरपालिका आयुक्त आशिष सिंह होते. त्यांनी अमिताभ यांना सांगितले की, इंदूरच्या 12 कॉलनी अशा आहेत. जिथून आता कचरा निघत नाही. यावर अमिताभ म्हणाले हे पाहण्यासाठी मी नक्की इंदूरला येईल. भास्करसोबत बोलताना सिंह यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या टीव्हीवर दाखवल्या गेल्या नाहीत. 

ते म्हणाले, सिंगल युज प्लास्टिकबद्दल मी बच्चन साहेबांना सांगितले की, यावर आम्ही 3 वर्षांपासून काम करत आहोत. जेव्हाही शहरातून याप्रकारचा (कचरा भरलेला) ट्रक जातो तेव्हा आम्ही तो जप्त करून त्याच्याकडून दंड वसूल करतो. आम्ही ट्रेंचिंग ग्राउंडवर कचऱ्याला बायोमायनिंग पद्धतीने संपवले. 

अमिताभ यांनी तीन ऐवजी दोनदा विजेता असल्याचे सांगितले... 
इंदूर 2017 मध्येही नंबर-1 झाले होते. 2018, 2019 मध्येदेखील नंबर-1 बनले. तरीही अमिताभ यांनी इंदूर दोन वर्षांपासून नंबर-1 वर असल्याचे सांगितले, यावर शहरभरात प्रतिक्रिया आल्या की, जे काम पहिले मेयर मालिनी गौड़ यांच्यासोबत महानगरपालिका आयुक्त असलेल्या मनीष सिंह यांनी केले, तीच तर सुरुवात होती. मात्र सिंह यांचे म्हणणे होते की, मी दोघांचाही उल्लेख केला होता, पण ते टीव्हीवर येऊ शकले नाही. 

प्लास्टिक वेस्ट एकत्र करण्यातही इंदूर नंबर-1... 
2 ऑक्टोबरला देशभरात 'स्वच्छता ही सेवा' या नावाने कॅम्पेन चालवले. यामध्ये इंदूर नंबर-1 वर आले. इंदूरमध्ये 2 ऑक्टोबरला 275 कार्यक्रम झाले, जे देशात सर्वात जास्त होते. यामध्ये 34 लाखपेक्षा जास्त लोक सामील झाले आणि 56 हजार किलोपेक्षा जास्त प्लास्टिक वेस्ट एकत्र केले गेले. इंदुरनंतर अहमदाबाद, ठाणे, बिलासपुर ही शहरे आहेत. 

बातम्या आणखी आहेत...