आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीला झाला होता न्युमोनिया..हॉस्पिटलमधून फोन येताच गरोदर पत्नीने उचलले टोकाचे पाऊल..वाचा काय आहे हे प्रकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- न्युमोनियाने ग्रस्त असलेल्या पतीची प्रकृती अधिक खालावल्याचे समजताच सात महिन्यांच्या गरदोर पत्नीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेतली. या घटनेची माहिती मिळताच शेजारच्यांनी तिला रक्तबंबाळ अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमध्ये गंभीर जखमी अवस्थेत तिने दोन जुळ्या मुलांना जन्म देताच तिची प्राणज्योत मालवली. आईच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन तासांतच नवजात जुळ्या बालकांनी जगाचा निरोप घेतला. नंतर व्हेंटीलेटरवर ठेवलेल्या पतीचाही मृत्यू झाला.

 

शहरातील साईनाथ नगरमध्ये सोमवारी (ता. 26 )दुपारी ही घटना घडली. मनोज (वय 37) आणि गायत्री असे या दाम्पत्याचे नाव आहे. मनोज एका कार फायनान्स कंपनीत नोकरीला होता. 10 वर्षांपूर्वी मनोज आणि गायत्रीचा प्रेमविवाह झाला होता.

 

मनोज गेल्या काही दिवसांपासून न्युमोनियाने ग्रस्त होता. गायत्री गरोदर असल्याने त्याने तिला हॉस्पिटलमध्ये येण्यास मनाई केली होती. मनोज 12 नोव्हेंबरला हॉस्पिटलमध्य चेकअपसाठी गेला होता. ताप आणि खोकला असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला अॅडमिट करुन घेतले. सोमवारी दुपारी जवळपास दीड वाजेच्या सुमारास मनोजचा भाऊ तरुण याने गायत्रीला फोन केला. मनोजच्या प्रकृतीविषयी सांगून तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितले.

 

40 फूट उंचीवरून घेतली गायत्रीने उडी

मनोजच्या प्रकृतीविषयी तरुणने सांगताच गायत्री अस्वस्थ झाली. ती हॉस्पिटलला जाण्यासाठी तयार झाली. फ्लॅटमधून बाहेर पडली. चौथ्या मजल्यावर आल्यानंतर अचानक तिने 40 फूट उंचीवरून उडी घेतली. उडी घेतल्यानंतर ती इमारतीच्या एका बाल्कनीच्या ग्रिलवर आदळून भेट रस्त्यावर पडली. त्यानंतर तिच्या शेजारच्यांनी तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये हलविले आणि उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

 

10 वर्षांनंतर घरात हलणार होता पाळणा...

गायत्रीचा थोरला भाऊ नरेशने सांगितले की, 10 वर्षांनंतर गायत्री आणि मनोजच्या आयुष्यात आनंदाचा क्षण येणार होता. घरात पाळणा हलणार असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. गायत्री सात महिन्यांची गरोदर होती.

 

डोळे उघडताच जुळ्या बालकांनी घेतला जगाचा निरोप 

नरेश म्हणाला, गायत्रीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिने जुळ्या मुलांना जन्म देताच तिची प्राणज्योत मालवली. मात्र, तिच्या जुळ्या मुलांनीही जन्मानंतर अवघ्या 3 तासांत जगाचा निरोप घेतला..

 

साडे चार तासांत उद्धवस्त झाले संपूर्ण कुटूंब..

- दुपारी 1:30 वाजता...गायत्रीने हॉस्पिटलमध्ये न जाता इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेतली. 
- दुपारी 2:00 वाजता... बेशुद्धावस्थेत गायत्रीने हॉस्पिटलमध्ये जुळ्या मुलांना जन्म देताच प्राण सोडला.
- सायंकाळी 5:00 वाजता..अवघ्या तीन तासांत नवजात शिशुंचाही मृत्यू.
- सायंकाळी 6:00 वाजता..बंसल हॉस्पिटलमध्ये व्हेंटीलेटरवर ठेवलेल्या मनोजची मालवली प्राणज्योत.

 

बातम्या आणखी आहेत...