आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तत्कालीन पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामेंसह पीडितेच्या अर्जावर आज सुनावणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद- तरुणीवर अत्याचारप्रकरणी तत्कालीन पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सशर्त जामिनातील दोन अटी शिथिल कराव्यात यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांच्यासमोरील सुनावणीप्रसंगी पीडित तरुणीच्या वतीने श्रीरामे यांचा जामीन रद्द करण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केल्यामुळे दोन्ही अर्जावर २० ऑगस्टला सुनावणी ठेवण्यात आली आहे. 


श्रीरामे यांनी सशर्त जामिनातील अटी रद्द कराव्यात यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात १० ऑगस्ट २०१८ रोजी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणीदरम्यान सरकार पक्षाच्या वतीने श्रीरामे यांची मुंबई येथे राज्य गुप्तचर विभागात बदली झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांना मुंबईला जावे लागणार असल्याने संबंधित ठाण्यात हजेरी देण्यासाठी येता येणार नाही. त्यामुळे या अटी रद्द कराव्यात, असा युक्तिवाद सरकार पक्षाने केला होता. 

बातम्या आणखी आहेत...