कमी वयात हार्ट / कमी वयात हार्ट अॅटॅक येण्याचे प्रमाण वाढतेय, ही आहेत कारणे

Aug 05,2018 05:03:00 PM IST

जगभरात हार्ट अॅटॅकचे प्रमाण वाढत आहे. परंतु भारतात ही स्थिती जास्त गंभीर आहे. येथे 30 ते 35 वर्षांच्या लोकांनाही हार्ट अॅटॅक येतो. आपल्या भागात हार्ट अॅटॅक येण्याचे वय १० वर्षांनी कमी झाले आहे. म्हणजे कमी वयातच हार्ट अॅटॅक येत आहे...


काय आहे कारण?
एका संशोधनानुसार आशियाई लोकांमध्ये हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता जास्त असते. परंतु याचे कारण काय हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचे आजार वाढत आहेत.


हार्ट अॅटॅक येण्याची कारणे
- फळे आणि हिरव्या पालेभाज्या कमी खाणे.
- व्यायामाचा अभाव.
- पोटावर अतिरिक्त चरबी तयार होणे.
- धूम्रपान करणे.
- उच्च रक्तदाब आणि मधुमेह


बचावाच्या सोप्या टिप्स
- रोज ३० मिनिटे व्यायाम करा.
- बाहेरचे तळलेले खाणे टाळा.
- धूम्रपान आणि दारू टाळा.
- वयाच्या तिशीनंतर आरोग्य तपासणी करा.
- जंक फूड टाळा.

X