जर तुम्हाला किंवा / जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाच्याही छातीत वेदना होत असेल तर थोडेही दुर्लक्षीत करु नका.. हा हृदयविकाराचा झटकाही असू शकतो

Sep 29,2018 03:18:00 PM IST

स्पेशल डेस्कः जर्नल हार्ट'मध्ये प्रसिद्ध झालेल्या स्पेनच्या नॅशनल सेंटर फॉर कार्डियोवॅस्कुलर रिसर्चच्या संशोधनानुसार सर्वात जास्त हार्ट अटॅक हे सकाळी पाच ते सात या काळात येतात...

काय सांगतात तज्ज्ञ?
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सकाळी लवकर येणारे हार्ट अटॅक खूप जास्त घातक असतात. ज्या लोकांना हृदयासंबंधी पहिल्यापासून तक्रारी आहेत आणि चुकीची जिवनशैली आहे त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. त्यांनी सावध राहावे.


सकाळी लवकर हार्ट अटॅक येण्याची कारणे...
- यावेळी शरीरामध्ये कार्टिसोल नामक हार्मोनची पातळी सर्वात जास्त असते. यामुळे रक्तदाब वाढतो आणि हार्ट अटॅक येऊ शकतो.

- या काळात हृदयाचे इलेक्ट्रिकल सिस्टम कमजोर होते. यामुळे हृदयामध्ये रक्तप्रवाह कमी होतो. हृदयाच्या पेशी खराब होऊ शकतात.

- यावेळी रक्ताच्या नलिका जास्त जाड आणि कडक होतात. यामुळे ब्लड क्लॉटिंग होऊ शकते आणि हार्ट अटॅकच्या संधी वाढतात.

- यामुळे रक्त खूप घट्ट होते आणि रक्तामधील प्लेटलेट्स जास्त चिकट होतात. यामुळे ब्लड क्लॉटिंगचे चान्स जास्त असतात.

- यावेळी रक्तात KLF15 नामक द्रव्य प्रवाही असते. ते प्रोटीनची पातळी कमी करते. यामुळे ब्लड क्लॉटिंग आणि हार्ट अटॅकचे चान्स वाढतात.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, बचावाचे पाच उपाय...

बचावाचे पाच उपाय... - रात्री झोपण्यापुर्वी एक ग्लास पाणी अवश्य प्यावे. यामुळे रक्तामधील थिकनेस आणि चिकटपणा कमी होईल. - हृदयाच्या तक्रारी असेल तर अचानक सकाळी उठणे, व्यायाम करणे किंवा शारीरीक कष्ट करणे टाळावे. - रात्री बाथरुमसाठी उठताना झटक्याने उठू नका. उठताना शरीर थोडे हलवा, ताणा. नंतर हळुहळू उठा.२४ तासांत एकदा हार्ट किंवा रक्तदाबाची गोळी घ्यायची असेल तर सकाळी किंवा दुपारी घेण्याऐवजी रात्री झोपण्यापुर्वी घ्यावी. - कमी मीठ, कमी साखरेचा चौरस आहार घ्या. नियमित रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी करा.
X