आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रीच्या अंधारात रस्त्यावर येऊन थांबली कार, यामध्ये डॉगी घेऊन निघाली एक व्यक्ती, यानंतर जे झाले ते पाहून सर्वांना येईल राग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टॅफोर्डशायर. इग्लंडमध्ये पोलिसांनी इमोशनल करणारा एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये एक व्यक्ती डॉगीला घेऊन कारमधून उतरतो आणि त्याला बेवारस सोडून पळून जातो. हा डॉगी कारचा पाठलाग करतो, पण काहीच फायदा होत नाही. ड्रायव्हर खुप निर्दयीपणे त्याला सोडून पळून जातो. आता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करणे सुरु केली आहे. ते आरोपी कार ड्रायव्हरचा शोध घेत आहे. या घटनेचे CCTV समोर आले आहे. हे पाहून लोक इमोशनल होत आहेत. त्या ड्रायव्हरचा सर्वांना खुप राग येतोय. 


त्या व्यक्तीच्या मनाला फुटला नाही पाझर 

- पोलिसांनी या घटनेचा जो व्हिडिओ जारी केला आहे तो 17 डिसेंबर ट्रेंटथम शहरातील एका रस्त्यावरील घटना आहे. एक व्यक्ती डॉगीला घेऊन कारमधून उतरतो आणि रोड क्रॉस करताना दूसरीकडून जाऊन त्याचा पट्टा काढतो. 
- यानंतर तो व्यक्ती थोडा वेळ तिथेच उभा राहतो आणि धावत येऊन कारमध्ये बसतो. डॉगीही त्याचा पाठलाग करत कारपर्यंत जातो, पण तोपर्यंत त्या व्यक्तीने दार लावलेले असते. 
- डॉगी टेंशनमध्ये येऊन कारला चक्कर मारतो, कारमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो. पण ती व्यक्ती दार उघडत नाही. डॉगी कारच्या दाराच्या साहाय्याने उभाही राहतो, पण ड्रायवरच्या मनाला पाझर फुटत नाही. 

 

कारचा पाठलाग करतो डॉगी 
- डॉगी दारापासून थोडा दूर गेल्यावर ड्रायव्हर कार स्टार्ट करुन पळून जातो. पण डॉगी कारचा पाठलाग करतो. पण काहीच फायदा होत नाही. नंतर तिथून जाणा-या एका व्यक्तीला डॉगी दिसतो. तो पोलिसांना माहिती देतो आणि पोलिस त्या डॉगीला प्राण्यांसाठी काम करणा-या संस्थेत पाठवतात. 
- प्राण्यांसाठी काम करणा-या संस्थेने डॉगीला शेल्टर होममध्ये पाठवले आणि डॉगीला बेवारसपणे सोडणा-या व्यक्तीचा शोध घेण्याची विनंती लोकांना केली. संस्थेच्या इंस्पेक्टर नताली म्हणतात की, घटनेचे फुटेज खुप वेदनादायी आहे. 
- नतालीनुसार डॉगीजवळ मिळालेली मायक्रोचिप स्कॅन केल्यानंतर त्यांना त्याच्या जुन्या दोन मालकांची माहिती मिळाली आहे. पण सध्या त्याचा मालक कोण होता याविषयी माहिती मिळू शकली नाही. 
- नतालीने सांगितले की, वेट्रिनरी स्टाफने त्या डॉगीचे नाव स्नूप ठेवले आहे आणि आता त्याची अवस्था चांगली आहे. डॉगी 'बुल टेरियर' प्रजातीचा आहे आणि तो जवळपास दोन वर्षांचा आहे. सध्या डॉगीला शेल्टर होममध्ये ठेवण्यात आले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...