आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात २८ मेपर्यंत राहणार उष्णतेची लाट; चंद्रपूर @ ४६.६, देशात सर्वात हाॅट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्यातील उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात २८ मेपर्यंत उष्णतेची लाट राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. शुक्रवारी चंद्रपूर येथे देशातील स‌र्वाधिक ४६.६ अंश तापमान नोंदवण्यात आले. दरम्यान, उष्माघाताने बीड  जिल्ह्यात एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. 


राज्यात विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात गेल्या आठवडाभरापासून तापमान सातत्याने ४० अंशांवर आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसांत राज्यातील उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. राज्यात २५ ते २८ मे या काळात विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आणखी तीव्र होईल. 
 

 

बीड जिल्ह्यात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू
सोनीजवळा (जि. बीड) येथील शेतमजूर भारत संभाजी गायकवाड (४०) हे गुरुवारी साळेगाव येथील आठवडी बाजाराला आले होते. बाजार आटोपून दुपारी ते परत गावाकडे पायी जात होते. वाटेत एका लिंबाच्या झाडाखाली ते बसले असता त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी ही घटना उघडकीस आली. त्यांचा मृत्यू उष्माघातानेच झाल्याचे  वैद्यकीय अधिकारी डॉ. आसाराम चौरे यांनी सांगितले.  
 

बातम्या आणखी आहेत...