आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेलबर्न - ऑस्ट्रेलियाच्या ५० वर्षीय हीदर स्वान या विंगसूट घालूून अंटार्क्टिकाच्या हिमशिखरांवरून उडी घेतली. असे करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला बनल्या अाहेत. १९९५ मध्ये स्वान यांचे लग्न ग्लेन सिंगलमनशी झाले. व्यवसायाने छायाचित्रकार असलेल्या हीदर यांनी या माेहिमेत १२ हजार फूट उंचीवरून उडी मारली हाेती. या वेळी त्यांचा वेग १८० किमी प्रतितास व अंटार्क्टिकावरील तापमान उणे ३५ अंश सेल्सियस हाेते. यापूर्वी त्यांना स्कायडायव्हिंगचा अनुभव नव्हता. लग्नाच्या २३ वर्षांनी त्यांनी स्कायडायव्हिंगमध्ये इतिहास रचला. याप्रसंगी त्यांच्यासाेबत त्यांच्या पतीनेही उडी घेतली.
ग्लेन सिंगलमनपासून प्रेरणा घेत स्कायडायव्हिंगकडे वळल्या
२३ व्या वर्षापर्यंत हीदर यांनी स्कायडायव्हिंगचे नावही एेकलेले नव्हते; परंतु अाता अंटार्क्टिकावरून उडी घेणाऱ्या पहिल्या महिला म्हणून त्यांचे नाव नाेंदवले गेले अाहे. ही माेहीम त्यांचे प्रेरणास्राेत व पती ग्लेन सिंगलमन यांच्यामुळे यशस्वी झाली. एका कार्यक्रमात ग्लेन यांच्या भाषणातून त्यांना प्रेरणा मिळाली. नंतर त्यांनी १९९५ मध्ये ग्लेन यांच्याशी लग्न केले.
म्हणाल्या- अाता एव्हरेस्टवरून उडी मारण्याची इच्छा
उडी घेतल्यानंतर हीदर म्हणाल्या- हिमशिखरांवरून उडी घेणे हा अागळावेगळा अनुभव हाेता. हे माझे गत १८ वर्षांतील सर्वात चांगले स्कायडाइव्ह हाेते. अंटार्क्टिकाच्या अंतर्गत भागापर्यंत जाण्यास खूपच कमी जणांना यश येते. मात्र, मी व ग्लेन दाेघेही असे करण्यात यशस्वी ठरलाे. अाता मी विंगसूट घालून एव्हरेस्ट पर्वतावरून उडी घेऊ इच्छिते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.