आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 वर्षीय यू-टुयबर दानिश जेहनला अखेरचा निरोप द्यायला मुंबईच्या रस्त्यांवर जमली हजारोंची गर्दी, पाणावलेल्या डोळ्यांनी दिला चाहत्यांनी निरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः प्रसिद्ध यूट्युबर दानिश जेहन याचे बुधवारी रस्ता अपघातात निधन झाले. गुरुवारी मुंबईत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या अंत्ययात्रेत हजारोच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. येथे उपस्थित प्रत्येकाचे डोळे यावेळी पाणावले होते. त्याच्या अंत्ययात्रेचे काही व्हिडिओज सोशल मीडियावर समोर आले असून यात आपल्या लाडक्या दानिशला अखेरचा निरोप द्यायला पोहोचलेल्या चाहत्यांची गर्दी दिसत आहे. 


केवळ 21 वर्षांचा होता दानिश...  
- मुंबईचा रहिवाशी असलेला दानिश फक्त 21 वर्षांचा होता. बुधवारी मध्यरात्री तो एका लग्नात सहभागी होऊन मुंबईतील त्याच्या घरी परतत असताना वाटेत वाशीजवळ त्याच्या कारला अपघात झाला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.  दानिश MTV चा रिअॅलिटी शो 'Ace of Space' मध्ये झळकत होता. त्याची वाइल्ड कार्ड एन्ट्री शोमध्ये झाली होती. या शोचा होस्ट 'बिग बॉस' फेम विकास गुप्ता आहे.


विकास गुप्ताने सोशल मीडियावर दिली अपघाताची माहिती..
- विकास गुप्ताने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करुन दानिशच्या अपघाताची माहिती दिली होती. त्याने शोक व्यक्त करताना लिहिले होते, "दानिश तू कायम आमच्या हृदयात राहशील. मी इतर हाउसगेस्ट्स (शो Ace of Space चे स्पर्धक)ला कसे सांगू की तू आता कधीही परतणार नाही. तू Ace of Space चा कलर्ड हेयर किंग होता. तू आमच्यापासून खूप दूर निघून गेला आहेत."

बातम्या आणखी आहेत...