आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना, बीडसह मराठवाड्यात पावसाची जोरदार हजेरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड शहरात धुवाधार पावसामुळे वाहनचालकांची त्रेधा उडाली. - Divya Marathi
बीड शहरात धुवाधार पावसामुळे वाहनचालकांची त्रेधा उडाली.

औरंगाबाद - वरुण राजा परतीच्या प्रवासाकडे वाटचाल करीत असताना बुधवारी सकाळी जालना जिल्ह्यातील भोकरदन परिसरातील अनेक गावाला पावसाने झोडपून काढले.  तर दुपारनंतर बीड शहरासह जिल्हा परिसरात धो धो बरसला. पारध (जि. जालना) येथील रायघोळ नदीला पूर आला आहे. तब्बल तीन तास पाऊस पडला. मंगळवारी सायंकाळी अंबड, जालना शहर परिसरात तासभर पाऊस पडला.   

पारधच्या रायघोळ नदीपात्र ओसंडून वाहिले तर  पिंपळगाव रेणुकाईच्या पुलावरून पाणी गेल्याने दीड तासापर्यंत पारसकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.  तर केळणा नदीला पूर आल्याने वाळूचे टिप्पर वाहून गेले. मात्र, चालक गणेश फुके (रा. फत्तेपूर) हा बचावला आहे.   या तालुक्यात आतापर्यंत ५५२.६३ मि.मी पाऊस एकट्या भोकरदन तालुक्यात झाला आहे..

बीडमध्ये धुवाधार :
बीड शहरात बुधवारी दुपारी दोन वाजेपासून सुरू झालेल्या अर्ध्या तासाच्या धुवाधार पावसाने बीड शहरातील रस्ते अक्षरश: जलमय झाले हाेते. दरम्यान, सुभाष रोड व जालना रोडवरून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना वाहनांचे हेडलाइट लावून मार्ग काढावा लागला. 

औरंगाबाद जिल्ह्यातही धो धो :
औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. शिवना परिसरात तब्बल साडे चार तास धो धो पाऊस झाल्याने परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. आमठाणा व परिसरात सकाळी आठ वाजेपासुन विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस सुरु झाला

लातूरला आजवरचा मोठा पाऊस :  
लातूर शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी रात्री मध्यम ते जोरदार पाऊस झाला. १२ मिमी इतकी पावसाची नाेंद केली आहे. लातूर शहराच्या काही भागात तर या वर्षीचा सर्वात मोठा पाऊस बुधवारी रात्री पडला.  पंधरा दिवसांपासून एक थेंबही पडला नव्हता. पोळा, गणेशोत्सव काळात लातूर जिल्ह्यात पाऊस पडण्याचा इतिहास आहे. 

बातम्या आणखी आहेत...