• Home
  • Bollywood
  • News
  • Heavy Prosthetic Measurement taking of Kangana Begins in Jason Collins' Studio to Become Jayalalithaa

तयारी / जयललिता बनण्यासाठी कंगनाचे हेव्ही प्रोस्थेटिक मेजरमेंट, जेसन कॉलिन्सच्या स्टूडियोमध्ये सुरु आहे तयारी

या चित्रपटाचे शूटिंग दिवाळीनंतर सुरु होणार आहे 

Sep 20,2019 04:28:31 PM IST

बॉलिवूड डेस्क : जयललिता यांच्या बायोपिकसाठी कंगनाची तयारी सुरु झाली आहे. भरतनाट्यम आणि तमिळनंतर आता कंगना, जयललिता यांच्यासारखे दिसण्यासाठी लॉस एंजेलिसमध्ये लुक टेस्ट करत आहे. तिचा हा लुक टेस्ट हॉलिवूड मेकअप आर्टिस्ट जेसन कॉलिन्सच्या स्टूडियाेमध्ये सुरु आहे. कंगनाची बहीण रंगोलीने त्याचदरम्यान काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


प्रोस्थेटिक ग्लूने झाकली गेली आहे कंगना...
या फोटोजमध्ये कंगना पूर्णपणे झाकलेली दिसत आहे. हा प्रोस्थेटिक ग्लू आहे, जो कंगनाच्या चेहऱ्यावर आणि बाॅडीवर लावला गेला आहे. निश्चितच हा मास्क सुकेपर्यंत कंगनाला खूप एकाच जागी वेळ बसावे लागले असेल. कंगनाचा लुक तयार करणाऱ्या जेसनबद्दल बोलायचे तर त्याने 'कॅप्टन मार्वल' आणि 'ब्लेड रनर 2049' यांसारख्या चित्रपटातील कलाकारांचा मेकअप केला आहे.


कंगनाचे असतील चार लुक...
चित्रपटात जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित चार फेज दाखवल्या जाणार आहेत, ज्यामध्ये त्यांची चित्रपट अभिनेत्रीपासून ते तामिळनाडूच्या सीएम बनण्यापर्यंतची कहाणी दाखवली जाणार आहे. यामध्ये सर्वात जास्त इंटरेस्टिंग तिची लास्ट फेज असणार आहे, ज्यासाठी कंगनाच्या चेहऱ्यावर एक्स्ट्रा प्रोस्थेटिकची गरज पडेल. कारण दोघींच्याही चेहऱ्याचा आकार वेगवेगळा आहे.


दिवाळीनंतर सुरु होईल शूटिंग...
'थलायवी' चे शूटिंग याचवर्षी नोव्हेंबरपासून सुरु होईल. जो तमिळ, तेलगु आणि हिंदीमध्ये रिलीज केला जाणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एएल विजय करणार आहे. तर चित्रपटाची कथा के व्ही विजय प्रसादने लिहिली आहे.

X