आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस; वरच्या ५ धरणांतून उजनीत ४० हजार क्युसेकने विसर्ग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेंभुर्णी- भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वरील १९ पैकी पाच धरणांतून उजनीमध्ये ४० हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. सात धरणे शंभर टक्के भरली आहेत. सध्या बंडगार्डन येथून १४ हजार तर दौंड येथून एकूण १३ हजार ५८६ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे. 


सोमवारी सकाळी दोन हजार ९९९ क्युसेक विसर्ग होता. त्यात सायंकाळी वाढ झाली. वरील धरणांतून येणारा प्रवाह मंगळवारपर्यंत (दि. १४) आणखी वाढणार असल्याने उजनीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या उजनी ३४ टक्के भरली आहे. ८१.२० टीएमसी एकूण पाणीसाठा अाहे. १८.२० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...