आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातिरुवनंतपुरम - केरळमध्ये पुराने कहर केला आहे. १९२४ नंतर पहिल्यांदाच केरळमध्ये एवढा विध्वंसक पूर आला आहे. अनेक नद्या कोपल्या असून दरड कोसळण्याच्या घटनांत चोवीस तासांत ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. आता राज्यात गेल्या ८ दिवसांत मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या ११३ वर पोहोचली आहे.
पुरामुळे मध्य केरळच्या अनेक भागांत वाहतूक व्यवस्था पूर्णपणे उदध्वस्त झाली आहे. कोची विमानतळावर १० दिवसांपासून पाणी झाले आहे. त्यामुळे विमाने ठप्प आहेत. मुल्ला पेरियारसह राज्यातील सर्व ३५ धरणे तुडुंब भरल्यामुळे त्यांची दारे उघडण्यात आली आहेत. पाण्याचा सातत्याने विसर्ग केला जात आहे. रविवारपर्यंत राज्यातील १४ पैकी १२ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुरामुळे १.५ लाखाहून अधिक लोकांना तात्पुरत्या निवाऱ्यात आश्रयाला जावे लागले आहे. स्थानिक सुरक्षा दल, एनडीआरएफ व सैन्याने पाण्यात अडकलेल्या लोकांना बोटेने किंवा एअर हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आहे. अनेक गावांनी पहिल्यांदा पूर पाहिला.
वीज, पाणी, रेल्वे, रस्ते सगळे ठप्प
- राज्याच्या विविध भागांत वीजपुरवठा, दूरसंचार प्रणाली, पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
- कासरगोड वगळता सर्व जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. महाविद्यालयाने परीक्षा स्थगित केल्या आहेत.
- पलक्कड, वायनाड व कोचीने पहिल्यांदाच पुराचा सामना केला. कोची शहरातील लोक कमरेपर्यंतच्या पाण्यात आहेत. येथील लोक आपले घर, जागा सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास तयार नाहीत.
भाविकांनी सबरीमाला तीर्थयात्रा करू नये, प्रशासनाचा सल्ला
मुल्ला पेरियार धरणातील पाणी पातळी १३६ फूट उंचीवर गेली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी परिसरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. या दरम्यान त्रावणकोर देवस्वोम मंडळाने पम्बा नदीची जलपातळी वाढल्यामुळे भाविकांनी सबरीमाला तीर्थयात्रा करू नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
- पुरामुळे दक्षिण रेल्वे व कोची मेट्रोची सेवा अनेक ठिकाणी ठप्प झाली.
- केरळमध्ये पुरामुळे २ हजारांहून अधिक घरे व १० हजारांहून जास्त किलोमीटर रस्त्यांचे नुकसान झाले.
विविध राज्यांत ८४० मृत्युमुखी
छत्तीसगड, उत्तराखंड, गुजरात, आसाम, नागालँड, महाराष्ट्रात पावसामुळे आतापर्यंत झालेल्या विविध घटनांत ८४० जणांना प्राण गमवावे लागले आहेत. छत्तीसगडच्या विजापूरमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे भोपालपट्टणसह अनेक भागांत पूरसदृश स्थिती आहे. भोपालपट्टणमध्ये ३९६.८ मिमी पावसाची नोंद झाली. उत्तराखंडमध्ये अनेक नद्या कोपल्या आहेत. बद्रीनाथ महामार्ग बंद झाला आहे. डेहराडूनला जमीन खचण्याच्या घटना घडल्या आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.