Home | Maharashtra | Mumbai | Heavy rain in Mumbai, road and railway tracks goes under water

जोरदार पावसामुळे मुंबई पाण्याखाली, रस्ते आणि रेल्वे ट्रॅकवर गुडघाभर पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 01, 2019, 12:27 PM IST

सबवे आणि रस्त्यावरील पाणी पम्पाच्या साहाय्याने बाहेर काढणे सुरू

 • मुंबई- शहरात रविवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी भरले. सोमवारी ऑफीसचा दिवस असल्यामुळे नागरिकांना प्रंचड तसमस्यांना सामोरे जावे लागले. सध्या रस्त्यावरील पाण्याला मोटार पम्पच्या साहाय्याने बाहेर काढले जात आहे.

  मुंबईतील या परिसरात पाणी
  पावसामुळे अंधेरी सब वे, कुर्ला सीएसटी रोडवर पाणी भरल्यानंतर याला बंद करण्यात आले. जागो-जागी बीएमसीचे कर्मचारी आणि पोलिस तैनात आहेत. सबवे आणि रस्त्यावरून पाणी काढण्यासाठी पम्पाची साहाय्यता घेतली जात आहे. लांब-लांबपर्यंत रस्त्यांवर फक्त पाणीच दिसत आहे. नागरिकांना गाडी चालवण्यासही अडचण होत आहे. दुसरीकडे सायन, चेंबूर, किंग्सरकल परिसरातही पाणी भरल्यामुळे मुंबई पोलिसांच्या गाड्याही पाण्यात अडकल्या.


  रेल्वे ट्रॅक पाण्याखाली
  मुंबईजवळील ठाणे, पालघर आणि नवी मुंबईमध्ये पावसामुळे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले. वेस्टर्न रेल्वेच्या पीआरओने सांगितल्यानुसार, ट्रॅकवर पाणी भरल्यामुळे 13 ट्रेन्स रद्द करण्यात आल्या. तसेच अनेक भागात लोकल कमी वेगाने धावत आहे.


  शहरात 39 झाडे पडली
  बीएमसीने सांगितल्यानुसार रविवारी शहरात 39 ठिकाणी झाडं किंवा झाडांच्या फांद्या तुटल्याची प्रकरणे समोर आली आहेत. त्यासोबतच शहरात अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या आहेत.


  मुंबईत चार दिवसातच महिन्याभराचा पाऊस
  अंदाजे 14 दिवस उशीराने येणाऱ्या पावसामुळे मुंबईतील मान्सूनवर शंका उपस्थित होत होती, पण मुंबई आणि आसपासच्या परिसरात पाऊस मेहरबान झाला आणि महिन्याभराचा कोटा चार दिवसातच पूर्ण केला. हवामना खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, 30 जूनपर्यंत मुंबई शहर (कोलाबा)मध्ये 540 एमएम, तर उपनगरात(सांताक्रुज) मध्ये 505 एमएम पावसाची नोंद झाली आहे. आकड्यानुसार, रविवारी संध्याकाळी 6 पर्यंत उपनगरात 524 एमएम, तर शहरात 357 एमएम पावसाची नोंद करण्यात आली आहे.

 • Heavy rain in Mumbai, road and railway tracks goes under water
 • Heavy rain in Mumbai, road and railway tracks goes under water
 • Heavy rain in Mumbai, road and railway tracks goes under water
 • Heavy rain in Mumbai, road and railway tracks goes under water
 • Heavy rain in Mumbai, road and railway tracks goes under water

Trending