आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
तालुक्यात गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे रंगावली नदीला पूर आला होता. पुरामुळे शेकडो कुटुंबे बेघर झाली. तसेच पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात वंतीबाई बोकल्या गावित (५५ रा. खोकसा), जामनाबाई लाशा गावित (६५, रा. बालहाट), सईदा हुसेन काकर (४५, रा.भगतवाडी, नवापूर), काशिराम बाबजी गावित (४५, रा. वाघळपाडा) यांच्यासह बंधारे येथील एक बेवारसाचा समावेश आहे. तहसील कार्यालयात प्रांताधिकारी अर्चना पढारे, तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या उपस्थितीत चार मृतांच्या नातेवाइकांना महसूल विभागाकडून प्रत्येकी चार लाखांची अार्थिक मदत करण्यात आली. धायटा परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले आहे. तसेच नवापूर शहरातील अनेक जण बेघंर झाल्याने त्यांच्यावर सामाजिक सभागृह, धर्मशाळेत राहण्याची वेळ आली आहे. विसरवाडी परिसरातील सरपणी व नागण नदीला पूर आल्याने नदीवरील काही फरशी पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, नवापूर शहरात शनिवारी दिवसभर मदतकार्य वेगात सुरू होते. जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह अधिकाऱ्यांनी परिसराला भेट देऊन पाहणी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.