आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस; संततधार पावसामुळे गोदावरीला पूर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीची मूर्ती जवळपास निम्मी पाण्याखाली होती. - Divya Marathi
रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीची मूर्ती जवळपास निम्मी पाण्याखाली होती.

नाशिक राेड  - नाशिक परिसरात शनिवारी रात्रीपासून संततधार सुरू असून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, नाशिक तालूका जलमय झाला आहे. रविवारी सकाळी आठपासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नाशिकमध्ये ६२ मिमी तर तालुक्यात ९४ मिमी पाऊस झाला. यामुळे गोदावरी, दारणा, वालदेवी आणि नासर्डी नदीला पूर आला. गंगापूर, दारणा व वालदेवी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. या भागात आणखी पाऊस झाला आणि ही धरणे भरली तर हे पाणी मराठवाड्यात जायकवाडी धरणात दाखल होते. 

 

> नाशिक जिल्ह्यात शनिवारपासून बहुतांश भागांत संततधार पाऊस झाल्याने गोदावरीला पूर आला. रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीची मूर्ती जवळपास निम्मी पाण्याखाली होती.

 

नांदूर-मधमेश्वरमधून गोदावरी पात्रात विसर्ग
इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि निफाड तालुक्यातील मुसळधार पावसाने गोदावरी नदीला पूर आला असून नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यातून रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ८०७० क्युसेक पाण्याचा गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू होता. दुष्काळग्रस्त मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. गेल्या वर्षी नांदूर-मधमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रात २५.२३० टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आले होते. हे पाणी जायकवाडीला पोहोचण्यासाठी थोडा वेळ लागणार असला तरी या धरणातील विसर्गामुळे गोदाकाठ परिसरातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

बातम्या आणखी आहेत...