आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्‍यता; २ शेतकरी पुरात वाहून गेले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड/परभणी/ हिंगोली- मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांत चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीनंतर जनजीवन पूर्वपदावर येत नाही तोच रविवारी रात्रीपासून  पुन्हा पावसाला सुरुवात झाली. नांदेड शहरात सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत तब्बल ६२.५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तर गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ३७.७० मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली.  


रविवारी रात्रीपासून नांदेड जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने ठाण मांडले. रविवारी रात्री उशिरा विष्णुपुरी बंधाऱ्याचा एक दरवाजा उघडण्यात आला. जलाशयातील पाणी पातळी कमी झाल्यानंतर सोमवारी सकाळी ८ वाजता दरवाजा बंद करण्यात आला. पण दुपारी ४ वाजता पुन्हा उघडण्यात आला. 


हिंगोली जिल्ह्यात सोमवारी (२० ऑगस्ट) रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासांत एकूण १३.०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात दिवसभरात सरासरी ६५.२६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. लातूर जिल्ह्यात या आठवड्यात सातत्याने रिमझिम पाऊस सुरू आहे. सहा दिवसांच्या पावसामुळे आतापर्यंत जिल्ह्यात पडलेल्या पावसाची सरासरी ४२२ मिलिमीटरवर पोहोचली. रविवारी  परभणी जिल्ह्यातही पावसाने सर्वदूर हजेरी लावली. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ९.८४ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत ३९२.७५ मिमी पाऊस झाला अाहे. 

 

वडगाव ज.  (ता.हिमायतनगर) गावाजवळील पूल पार करताना मारुती संग्राम बिरकुरे (६२) हा शेतकरी पुरात वाहून गेला. त्यांचा सायंकाळपर्यंत काही ठावठिकाणा लागला नाही.  तर हदगाव तालुक्यातील कवाना येथील भारत हरिभाऊ तोडकर (३५) हा शेतकरी नाल्याच्या पुरात वाहून गेला.  नाल्याच्या पुराचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. 


विदर्भ

विदर्भातील सर्व जिल्ह्यांत म्हणजे अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यात मुसळधार पाऊस पडेल.

काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होईल.

 

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यात वातावरण निर्माण झाले आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

 

उत्तर महाराष्ट्र

नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. मध्यरात्रीनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे.

 

कोकण

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई व उपनगरात, ठाणे, पालघर जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू राहिल. रात्रभर संततधार पावसाची शक्‍यता आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, नांदेड व उस्‍मानाबाद येथे झालेल्‍या मुसळधार पावसाचे फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...