आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Heavy Rainfall In Kerala; Red Alert In 6 Districts, Tamil Nadu Also Receive Torrential Rains

केरळमध्ये अतिवृष्टी; ७ जिल्ह्यांत रेड अलर्ट, तामिळनाडूतही मुसळधार पाऊस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिकमंगळूर पावसामुळे घराची पडझड झाल्यानंतर तेथून उरलेसुरले साहित्य घेऊन जाताना एक कुटुंबीय. - Divya Marathi
चिकमंगळूर पावसामुळे घराची पडझड झाल्यानंतर तेथून उरलेसुरले साहित्य घेऊन जाताना एक कुटुंबीय.

तिरुवनंतपुरम/चेन्नई - केरळ आणि तामिळनाडूत सोमवारी मुसळधार पाऊस झाला. केरळच्या ७ जिल्ह्यांत जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून प्रशासनाने केरळच्या ७ जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला आहे.
केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने तिरुवनंतपुरम, अलपुझ्झा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, थ्रिसूर आणि पलक्कड या जिल्ह्यांत सोमवारी आणि चार जिल्ह्यांत मंगळवारी रेड अलर्ट जारी केला. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन अशा भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवणे आणि त्यांना ‘इमर्जन्सी किट’चा पुरवठा करणे अशी व्यवस्था प्रशासनाला रेड अलर्ट जारी केल्यावर करावी लागते. कोची येथे मतदारांना पुराच्या पाण्यातून वाट काढत मतदानाचा हक्क बजवावा लागला. एर्नाकुलममध्ये २० सेंमी, वायकोममध्ये १९ सेंमी, अलपुझ्जा, मानकोम्पू येथे प्रत्येकी १६ सेंमी, कोचीत १६ सेंमी, कोझा येथे १५ सेंमी, पुनालूर आणि कोन्नी येथे अनुक्रमे १२ सेंमी आणि ११ सेंमी पावसाची नोंद झाली.
 

निलगिरी जिल्ह्यात १० ठिकाणी भूस्खलन
उधगमंडलम । गेल्या दोन दिवसांपासून तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यात जोरदार पावसामुळे १० ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. त्यामुळे सोमवारी सकाळपासून कुन्नूर येथे वाहतूक विस्कळीत झाली होती. ढिगारे हटवण्यासाठी युद्धपातळीवर कारवाई सुरू आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. कुन्नूर-मंजूर रस्त्यावरील केंडाळा येथे माती आणि मोठे दगड पडले होते. वेलिंग्टनजवळ तीन ठिकाणी भूस्खलन झाल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, महामार्ग विभागाने तातडीने रस्ता मोकळा करून दिला. दरम्यान, जिल्हाधिकारी के. राजामणी यांनी सोमवारी कोइम्बतूर जिल्ह्यात शाळा आणि शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर केली. मंगळवारीही जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
 
 

बातम्या आणखी आहेत...